*अर्थशास्त्री बाबासाहेब आम्बेडकर**
जसजसा बाबासाहेबांच्या कर्तूवाचा काळ मागे जात तसतसे अम्बेडकरी विचारांचे नवे नवे आयाम पुढे येत आहेत सुरवातीला केवळ अस्प्रुशंचे नेते म्हणणारे नंतर बाबासाहेबांना घटनाकार, नंतर कायदा तद्न्य, नंतर समाजशास्त्री , नंतर राजकारणी व अर्थकारनी असे अनेक आयाम जाणून घेऊन बाबासाहेबांचे कार्य स्वीकारू लागला आहे असाच एक आयाम म्हणजे अर्थशास्त्री बाबासाहेब
हा आयाम समजून घेण्यासाठी आपल्याला 1912 मध्ये जावे लागेल 21 वर्ष वयाचे भीमराव अम्बेडकर एलिफिस्टन महाविद्यालयातून पदवी पुर्ण करतात व त्याकाळी पुरोगामी विचारांचा एक राजा बडोदा संस्थानात राज्य करीत होता त्यांचे नाव महाराज सयाजीराव गायकवाड .मुम्बई महानगर पालिकेत त्यावेळी सयाजीरावांनी भाषण केले व त्यात ते म्हणाले की जर अस्प्रुष्य वर्गांतील तरुण जर विदेशी जाऊन शिकण्यास तयार असेल तर मी आर्थीक मदत करावयास तयार आहे हा धागा धरून केलूस्कर गुरुजी तरुण बाबासाहेबांनां घेऊन सयाजीरावाकडे जातात व सयाजीराव बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मंजूर करतात आणि सुरू होतो अर्थशास्त्री बाबासाहेबांचा प्रवास
1912 ला वयाच्या 21 व्या वर्षी कोलम्बीया विद्यापिठात प्रवेश
M A साठी अर्थशास्त्र विषयत प्राचीन भारतातील व्यापार या उपविषयँत्रगत *"The Finance and Administration of East India Company from 1791 to 1858"* या विषयावर प्रबंध सादर
इतका मोठा कालखंड घेऊन ईस्ट इंडिया कम्पनी च्या धोरणाचा अभ्यास करणारे एकमेव असावेत.या प्रबंधात बाबासाहेब म्हणतात ,"भारतीयांच्या आर्थीक अधःपतनाला जर कोणी जबाबदार असेल तर ते ब्रिटिश सरकार आहे ."पुढे बाबासाहेब लिहतात ब्रिटिश गरीब शेतकऱ्यांकडून अतिशय अल्प दरात कचा माल विकत घेतात आणि त्यावर प्रक्रिया मात्र ब्रिटन मध्ये करतात आणि तो परत भारतात आणुन विकतात त्यामुळ त्याची किंमत वाढते व यातून गरिबांचे शोषण होते ही व्यापार करण्याची पद्धत चुकीची ठरवतात व या कालावधीत ब्रीटीशांनी भारतीयांचे कसे आर्थिक शोषण केले यावर सविस्तर विवेचन करतात
येथे जेव्हा जेव्हा 23 वर्ष वयाचे भीमराव 54 वर्ष वयाच्या सेलीग्मन या आपल्या गुरुशी संवाद साधत तेव्हा तेव्हा सेलिंग्मन म्हणत येणाऱ्या काळात हा तरुण अर्थशास्त्रची पायेमुळे बदलून टाकेन इतकचं नव्हे तर ही पदवी पुर्ण झाल्यावर *Landon School of Economics* मध्ये जाण्यासाठी प्रा. सेलिंग्मन जे शिफारस पत्र आपल्या मित्राला waxwel लिहले आहे त्या पत्रात selingma म्हणतात अर्थशास्त्रची नव्या पधतिने मांडणी करणाऱ्या तरुणाला पाठवत आहे
याचवेळी विद्यापीठात दुसरी M A ची पदवी घेतात विषय आहे *National dividend of India -A historic and analytical study* आणि " *Caste in India:Their mechanism, Genesis and Development "* या विषयात Ph.D. आहे .
1916 मध्ये असा जवळपास 4 वर्ष लागणार अभ्यासक्रम 2 वर्ष्यात पुर्ण करून 24 वर्षाचे तरुण भीमराव *London School of Economics मध्ये D Sc* साठी दाखल होतात आणि विषय निवडतात *"The problem of Rupee - Its origin and Solutions* " हा विषय निवडण्यामागेही कारण होत ज्याप्रमाणे ब्रिटिश या देश्यात कारभार करत होते त्यामुळे रुपया स्थिर होत नव्हता यांचे कारण शोधण्यासाठी रुपयाची समस्या जाणून घेन्यासाठी विषयाची निवड.
काही कामाची सुरवात होताच बडोदा सरकार कडून शिष्यवृत्ती सम्पल्याची तार येते व जून 1917 मध्ये तो प्रबंध अर्धवट सोडून भारतात वापस यावं लागत.
बडोदा संस्थानातं वाईट अनुभव नौकरी सोडून मुम्बई ला वापस काही काळ इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणूण काम लोकांना जात माहीत झाल्यामुळे ती एजेन्सी बंद 1918 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी सिड्नेहम महाविदयालयात राजकीय अर्थशास्त्रचे ( *Political Economy )* प्राध्यापक म्हणूण नियुक्ती
1918 मधेच Journal of Indian Economy या जर्नल मध्ये बाबासाहेब " *Small Holdings In India and their Remedies"* हा पेपेर पब्लिश करतात त्यात ते आजच्या शेतीविषयक अर्थशास्त्रनुसार शेतीवर लोकसंख्येचा जास्त भार पडू नये यासाठी औधोगीकरनांची गरज विशद करतात. शेतीच उत्पन वाढवन्यासाठी शेती फ़ायदेशीर आसन्याची गरज सांगतात आणि यासाठी शेतकऱ्यांच्या भांडवली गुंतवणूकिसाठी आग्रही असतात यातून शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी होऊन दरडोई उत्पन वाढेल व परिणामी जमिनीचा आकार वाढेल व यासाठी औधोगिकर वाढवणे आवशक आहे अशी भूमिका मांडतात यासाठी शेतकऱ्याला भांडवलाची उपलब्धता करून दिली तर तो सावकाराकडे जाणार नाही व आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही
पुढे सामाजिक कार्य आहे ,साउथburo आयोगासमोर प्रतीनीधीत्वाची मागणी 1920 मध्ये मूकनायक सुरवात , शाहूमहाराज भेट, माणगाव परिषद ई .आणि शाहू महाराज यांच्या मदतीने परत *London School of Economics* मध्ये रुपयाची समस्या दूर करण्यासाठी दाखल 32 वर्षांचे भीमराव भारतातील रुपयाच्या अस्थिरतेची कारने शोधून सांगतात की भारतासारख्या विकसनशील देश्यात जी विनिमय पद्धत वापरली जाते ती चुकीची आहे त्यामूळेच चलनवाढ होते एवढच नव्हे तर ब्रिटिश सरकार रुपयाची किमत क्रुत्रीम रित्या चढती ठेऊन त्याना कसा फायदा होईल याचीच काळजी घेतात हे पुराव्यानिशी सिद्ध करतात.
विनिमयाच्या दोन पद्धती
*1.Gold exchange method* (सुवर्ण विनिमय पद्धत )and 2 *.Gold standerd method* सुवर्ण प्रमाण पद्धत
त्याकाळी अर्थशास्त्रचे पितामह असलेले जॉन मेनार्ड केंन्स यानी मांडलेल्या सिद्धांतासमोर भीमराव आव्हान उभ करतात केंस्य यांच्या म्हणण्यानुसार "भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीचा वापर केल्यास रुपयाचे मूल्य आपोआपच स्थिर होईल" या मांडणीला विरोध करून भीमराव म्हणतात केन्स्य यानी केलेल्या मांडणीत मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष केलं आहे व काही बाबी ग्रुहीत धरून सिद्धांत मांडला आहे त्यामुळे रुपया स्थिर होत नाही.हा प्रबंध पुर्ण करून 1923 ला भीमराव भारतात परततात.
या मांडणीमुळे अर्थशास्त्रला नवा सिद्धांत मिळाला व नव्या रूपाने अर्थशास्त्रवर संशोधन सुरू याचाच एक भाग म्हणूण 1925 मध्ये " *Royal commission on Indian Currency and Finance* " भारतात दाखल त्यासमोर साक्ष देताना भीमराव म्हणतात, "रुपयावर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यासाठी आपली स्वतंत्र मॉनेटरी पॉलिसी असली पाहिजे व त्यासाठी देशात एका केंद्रीय बँकेची आवशकता आहे व ही बँक सर्व बँकांची बँक असेन"आणि यानुसार पुढे 1 एप्रिल 1935 ला *Reserve Bank of India* ची स्थापना झाली .पुढे केंद्र आणि राज्य यामध्ये आर्थिक नियोजनासाठी एक आयोग असला पाहिजे यानुसार 1951 मध्ये *वित्त आयोगाची स्थापना* झाली.
1942 ला श्रम, जल, विद्द्युत आणि मजूर या खात्याचे मंत्री झाल्यावर केंद्रीय जल विद्द्युत नीती बाबासाहेब तयार करत्तात.केंद्रीय तांत्रिक विद्द्युत मंडळांची स्थापना केली.
अश्या प्रकारे अर्थशास्त्रात मूलगामी योगदान देणाऱ्या बाबासाहेबांना शतशः नमन
प्रा .डॉ .सिद्धार्थ घाटविसावे (8692887894)
Comments
Social Counter