. . अचानक गाडगे बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले. वर केलेल्या दोन्ही हातात हार घेउन स्टेजसमोर उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले...-.. ." बाबा तुम्ही खाली का उभे..? वर या ना..".. . " नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या आणि या अडाण्याचाहार घ्या.."." बाबा, तुम्ही अगोदर वर या मग मी हार घेईन.."." नाही बाबासाहेब, तुम्हीच आधी खाली या..".. . बराच वेळ ते दोन महापुरूष एकमेकांना विनंत्या करीत होते. बाबासाहेबांच्याभाषणाची तार तुटली होती. वेळ होत होता म्हणून बाबासाहेब जरा रागातच म्हणाले... " बाबा तुम्ही, स्टेजवर का येत नाही..?.त्यावर ते संतशिरोमणी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र आवाजात बोलले... " बाबासाहेब... तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात, त्या स्टेजला पाय लावायची माझी तरी लायकी नाही...''.. . गाडगेबाबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली. " आता तुमचे चालू द्या.." असे बोलून क्षणांत गाडगे महाराज निघून गेले..... . याला म्हणतात एका निष्कलंकित चारिञ्याने दुसऱ्या निष्कलंकित चारिञ्याची केलेली कदर..... . संतांचा निरोप घेऊन बाबासाहेब मंचाकडे वळले तर काय आश्चर्य... स्टेजवरील सर्व खुर्च्या रिकाम्या. सर्व नेते व कार्यकर्त्यांनीखाली प्रेक्षकांत बसणे पसंत केले. बाबासाहेब एकटेच मंचावरून भाषण देत होते आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते..... . जेव्हा गाडगेबाबांचे कीर्तन चालू असायचे तेव्हा बाबासाहेब तिथे गेल्यावर खालीच बसायचे. लोक त्यांना म्हणायचे की बाबासाहेब आपण वर बसा पण बाबासाहेब मात्र खालीच बसायचे आणि म्हणायचे की... " जेथे संत गाडगेबाबा असतील तेथे घाण असूच शकत नाही...''.. . स्वतःच्या मुलाच्या मृत्यूने गाडगेबाबांवर कुठलाही परिणाम झाला नाही, परंतु बाबासाहेबांचा मृत्यू झाला हे कळवल्यावर अवघ्या १४ दिवसात प्राण सोडणारेसंत गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध कसे असतील...???
राम जाधव डेबूजी युथ ब्रिगेड जि. यवतमाळ
Comments
Social Counter