
*क्रांतीकारी बुद्ध भाग - १*
-----------------------------------
तथागत बुद्ध हे शांतीचे बुद्ध का क्रांतीचे बुद्ध ?
तथागत बुद्ध हे जाचक ब्राम्हण व त्यांच्या ब्राम्हणधर्माच्या विरोधात क्रांती करत होते. बुद्ध सांगतात क्रांती घडवून आणण्यासाठी क्रांतीकारी लढवय्यांची फौज लागते म्हणून बुद्धाने आपल्या बौद्धसंघातील भिक्षूंनी "लढवय्ये बना" असा सल्ला दिलेला होता. एकदा भिक्षूंनी बुद्धांना विचारले आम्ही लढवय्ये, आम्ही लढवय्ये असे स्वतःला म्हणवून घेत असतो पण आम्ही नक्की कशाप्रकारचे लढवय्ये आहोत ? यावर तथागत बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो आपण युद्ध पुकारतो त्यामुळे आपण लढवय्ये आहोत.
माझ्या मनात असा विचार येतो की आजपर्यंत मी बुद्धांच्या प्रतिमा बघितल्या आणि त्या प्रतिमेखालील स्लोगन बघितला तो स्लोगन होता *"युद्ध नको बुद्ध हवा"* म्हणजे आम्हाला शांततेचा, संयमी बुद्ध पाहिजे पण बुद्ध तर कधीच शांत नव्हते, संयमी नव्हते तर ते क्रांतीकारी होते बुद्ध सांगायचे की आपण युद्ध पुकारले पाहिजे पण आपण युद्ध कशासाठी पुकारले पाहिजे *"स्वाभिमानासाठी, आत्मसन्मानासाठी, ज्ञानासाठी* म्हणून बुद्ध सांगत होते आपण युद्ध लढतो म्हणून आपण स्वतःला लढवय्ये म्हणतो. जेव्हा जेव्हा तुमचा आत्मसन्मान धोक्यात असेल तेव्हा तेव्हा लढणे सोडू नका, शांत राहु नका, तेव्हा तुम्ही लढायलाच हवे, तेव्हा तुम्ही युद्ध करायलाच हवे.
विचार करा बुद्ध जर आपल्याला आत्मसन्मानासाठी, स्वाभिमानासाठी लढायला सांगतात तर बुद्ध हे शांतीचे प्रतिक असुच शकत नाही.
तथागत बुद्ध हे स्वतः युद्ध पुकारून क्रांती करत होते, मग आपले बुद्ध शांतीचे का क्रांतीचे ?
*बुद्ध क्रांतिकारी कसे झाले हे बघुया.*
-----------------------------------------
तथागत बुद्धाने ब्राम्हण आणि ब्राम्हण धर्माविरुद्ध युद्ध पुकारले होते. विदेशी आक्रमक ब्राम्हणांनी मुलनिवासी भारतीयांना गुलाम बनवुन त्यांचा आत्मसन्मान लुटला होता. आपल्या लोकांचा आत्मसन्मान परत मिळवावा असे तथागत बुद्धाला वाटत होते. त्यामुळे तथागताने ब्राम्हणांच्या विरुद्ध युद्ध छेडले होते आपल्या लोकांना ब्राम्हणधर्माच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठीची बुद्धांची ती प्रत्यक्ष क्रांती होती त्यासाठी बुद्धाने स्वतः आणि आपल्या अनुयायांना लढवय्ये योद्धे म्हटलेले होते आणि सत्य व आत्मसन्मानासाठी लढत रहा, असा सल्ला त्यांना दिलेला होता.
*इ.स.पूर्व १८५* मधील प्रतीक्रांतीनंतर, ब्राम्हणांनी खरा *क्रांतिकारी बुद्ध* लपविला आणि ध्यानस्त अवस्थेमध्ये डोळे मिटलेला *शांत बुद्ध* लोकांपूढे सादर केला. यामुळे भिक्षु आणि सामान्य लोक हे आपली क्रांतीकारी आणि लढाऊ प्रेरणा विसरले आणि शांतताप्रेमी व गप्प असे बघे बनले. वर्तमानामध्ये सुद्धा बौद्धधर्मामध्ये आपल्याला असे कित्येक भिक्षु बघायला मिळतात. तथागत बुद्धाला हे मुळीच अपेक्षित नव्हते बौद्ध भिक्षूंची आणि सामान्य बौद्धजनांची ही न लढवण्याची प्रवृत्ती हे सुद्धा भारतातून बौद्धधर्म नष्ट होण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्यामुळे बौद्धधर्माच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आणि धम्माच्या सत्याचा सर्वत्र प्रचार प्रसार करण्याकरिता, बौद्धभिक्षु तसेच सामान्य बौद्धजनांनी लढवय्ये बनावे त्यांनी योद्धे बनायलाच पाहिजे.
मग आता सांगा आपले तथागत बौद्ध हे 'शांतीचे बुद्ध' आहेत की 'क्रांतीचे बुद्ध'
*(संदर्भ:- क्रांतिकारी बुद्ध, पान क्र-१३)*
✒ *प्रतिक्षा चव्हाण*
(भारतीय विद्यार्थी मोर्चा,नाशिक)
Comments
Social Counter