All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    विठ्ठल म्हणजे बुद्धच



    विठ्ठल म्हणजे बुद्धच !!!
    २५०० वर्षापूर्वी तथागत बुद्धाने क्रांती करून अखिल मानव जातीला बौद्ध धम्म दिला . अनिष्ट चालीरीती अंधश्रद्धा काल्पनिक देव आणि अमानवीय असलेले वेद यांचा भरणा असलेला वैदिक धर्म हा बुद्धानंतर नामशेष झाल्यासारखा झाला . संपूर्ण भारतात आणि भारता बाहेर बौद्ध धम्म आणि बुद्धाची लोकप्रियता इतकी वाढली कि सर्व लोक बौद्ध धम्मात सहभागी होऊन बुद्ध ,धम्म आणि संघाला अभिप्रेत असणार्या मानव धर्मा कडे आकृष्ट होऊ लागली .
    यज्ञामध्ये प्राणी हत्या आणि जीवाचा बळी देण्याला बुद्धाने विरोध केला त्यामुळे समस्त मानव जातीला वैदिक धर्माचा तिटकारा वाटू लागला त्यामुळे वैदिक धर्म बहुजन लोकापासून बुद्धाच्या काळात दुरावला . पुढे अनेक शतकापर्यंत बुद्धाची प्रसिद्धी आणि बौद्ध धम्म यांचा प्रचार प्रसार सम्राट अशोक ,कनिष्क ,हर्षवर्धन सारख्या राजांनी केल्यामुळे जनमानसात याचा प्रचंड प्रभाव पडला . अगदी पुष्पमित्र शुंगाने प्रतिक्रांती जरी केली अनेक भिक्खूची कत्तल केली तरीही सामान्य लोकांना आपल्याकडे ओढण्यासाठी बुद्धाची पूजा ,रथयात्रा , बौद्ध सन इ .गोष्टी सुरूच ठेवल्या होत्या . इ .सनाच्या ८ व्या शतकापर्यंत बौद्ध धम्म लोकांच्या मनात आणि सम्राट अशोक कानिश्काच्या निर्माण केलेल्या विहार ,लेणी ,स्तंभ या स्वरुपात अस्तित्वात होता . काही ठिकाणी बंगाल ,सिंध आणि ओरिसा प्रांतात तर ११ आणि १२ व्या शतकात बौद्ध धम्म टिकून होता परंतु नेमक अस काय झाल कि बौद्ध धम्म नष्ट करण्यात बर्याच अंशी यश वैदिक परंपरेला आल परंतु बुद्ध व्यक्ती रुपात ते नष्ट करू शकले नाही ? याच कारण बुद्ध हा जगात पोहचला होता परंतु प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसला होता . पुढे वैदिक धर्माने हा बुद्धाचाच धर्म आहे म्हणून लोकांच्या मनात आचरणात वैदिक गोष्टी भरून दिल्या .
    ८ व्या शतकात शंकराचार्याने बौद्ध धम्माच्या समूळ उच्चाटनासाठी अनेक पाऊले उचलली बुद्धाला विष्णूचा अवतार दाखवून जे मुळचे बौद्ध होते त्यांना आपल्याकडे आकर्षित केल आणि ज्या मुस्लीम आक्रमणांनी थोडाफार बौद्ध धर्म विहार ,लेणी,स्तंभ रुपात होता त्याचे आतोनात नुकसान मुस्लीम शासकांनी केले .याचा फायदा घेऊन शंकराचार्याने पुराणे ,मनुस्मृती ,महाभारत ,रामायण या सारख्या गोष्टी करून मुळच्या बौद्ध असलेल्या भारतीय लोकांना वैदिक धर्माच्या गोष्टी घालवून स्वताला मुस्लीम शासकांनी " हिंदू" म्हणून दिलेली शिवी ही स्वीकारली कारण बुद्धाचे विचार धम्म त्यांना हद्दपार करायचा होता . ज्या बुद्धाच्या काळात प्राणी हत्या करून मासभक्षण वैदिक ब्राम्हण करत होते त्यांनी या काळात शाकाहार स्वीकारून आपण सर्व " हिंदू " आहोत म्हणून ८ व्या शतकापासून प्रतिक्रांतीला सुरुवात केली ,जे विहार लेणी होत्या त्यावर ताबा मिळवून तेथे वैदिक अर्थात नंतर हिंदू नाव देऊन आपल वर्चस्व मिळवून भिकारेपनाचा कळस गाठला . शैव आणि वैष्णव पंथ निर्माण केले .वैष्णव पंथ तर बौद्ध धर्माचे भग्न रूप आहे . यापासून समांतर वारकरी संप्रदाय निर्माण झाला . बौद्ध धर्माचे नाव घेण्याला इतकी भीती होती कि त्यामुळे असे पंथ निर्माण झाले परंतु बुद्धाची महिमा प्रसिद्धी कोणीच संपवू शकले नाही म्हणून बुद्धाला विष्णूच्या अवतारात त्यांना दाखवावच लागल .
    पंढरपूर चे विहार विठ्ठल मंदिर , तिरुपती चे विहार बालाजी ,ओरिसा पुरी चे विहार जगन्नाथचे मंदिर , केदारनाथ ,अमरनाथ अशा अनेक ठिकाणचे विहारे बळकावून तेथे भग्न काल्पनिक देवांची निर्मिती करण्यात आली .पंढरपूर चे विठ्ठल मंदिर तर अनेक पुराव्यांनी सिद्ध होते कि ते प्राचीन बुद्ध विहार होते आणि विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाचीच आहे ."पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्तीही आहे. यावर मी एक प्रबंध लिहित आहे. जो कि पुण्याच्या संशोधन मंडळापुढे वाचला जाईल. पांडुरंग हा शब्द पुंडरीक या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. पांढर्या कमळास पाली भाषेत पांडुरंग म्हणतात, याचा अर्थ पांडुरंग दूसरा तिसरा कुणी नसून बुद्ध आहे" हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या "Who is Pandurang" हा शोध निबंध मार्च १९५५ मध्ये लोणावळा येथे लिहावयास घेतला होता. विठ्ठल मंदिरात खांबावर बुद्धाच्या ध्यानस्थ मुर्त्या आढळतात . अनेक संत कवींनी विठ्ठल म्हणजेच बुद्ध आहे आपल्या काव्यातून सिद्ध केले आहे . पंढरपूर ची यात्रा आषाड एकादशी ला भरविण्याच कारण कि बुद्धाने आपला प्रथम धम्मोपदेश पंचवर्गीय भिक्खू ला दिला होता .पाली भाषेत पांडुरंग या शब्दाचा अर्थ 'पांढरे कमळ' असा होतो. म्हणजे ज्याने पांढरे कमळ धारण केले आहे असा तो. बौद्ध वांगमयत पांढर्या कमळाला अनन्य साधारण महत्व आहे हे बौद्ध अभ्यासकांना ठाऊकच आहे. आणि याला सबल पुरावा म्हणजे अजंठा येथील बुद्ध लेणी. या लेणीत एक चित्र पद्मपाणी बुद्धाचे आहे, ज्याने पांढरे कमळ हाती घेतले आहे. वर दिलेला एक फोटो अजिंठा लेणीमधील आणि दुसरा विठ्ठलमंदिरातील मूर्तीचा आहे बुद्धाच्या ह्या मूर्तीवर थोडाबदल करून आला जरी असला तरी पूर्ण मूर्ती ते बदलू शकले नाहीत .
    लोक देखोनि उन्मत दारांनी आसका |
    न बोले बौद्ध रूपे ठेविले जधनी हात ||
    नववा वेसे स्थिर रूप तथा नाम बौद्ध रूप |
    संत तया दारी! निष्ठान्टती निरंतरी ||
    - संत एकनाथ
    बौद्ध अवतार माझिया उदृष्ट | मौन मुखे निष्टा धरियेली ||
    मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी | बौद्ध ते म्हणोनी नावे रूप ||
    - संत तुकाराम
    कलयुगी बौध्द रुप धरी हरी । तुकोबा शरीर प्रकटला ।।
    - संत बहिणीबाई
    गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू ।
    आपण योगेश्वरु बौद्ध रुपी ॥
    व्रतभंगासाठी बौद्ध अवतार ।
    झाला दिगंबर अवनिये ।
    ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासी ॥
    - संत नामदेव
    अशी अनेक पुरावे आहेत कि जी बौद्ध विहार आणि विठ्ठल हाच बुद्ध आहे हे अंधपाणाचे प्रदर्शन करणार्यांनी इतिहासाची पाने दवडून वाचावी कि आपण मागील काळाचे मुळचे बौद्ध होतो .
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES