All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    स्त्रियांचे प्रश्न आणि बाबासाहेब


    विजयलक्ष्मी पंडीत यांच्या समवेत रात्रीचे जेवण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरस्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर येतो. स्त्री-मुक्ती चळवळीनं यासाठी केलेलं काम मोठं आहे. आज शिक्षणाचा प्रसार झाला. स्त्रियांकडं सन्मानानं पाहिलं जातं हेही एक वेळ मान्य करू; पण स्त्रियांना त्यांच्या मनासारखं स्वातंत्र्य मिळतं का? शहरी स्त्रिया, शिकलेल्या स्त्रिया किंवा नोकरी करणार्या  स्त्रिया हे स्वातंत्र्य अधिक मिळवतात; पण ग्रामीण भागात राहणार्यार, अशिक्षित, कष्टकरी स्त्रियांना कुठलं स्वातंत्र्य मिळतं? स्त्रियांना पन्नास टक्के राखीव जागा मिळाल्या; पण केवळ जागा देऊन भागणार आहे का? त्यासाठी समाजात, विशेषत: समाजमनात आदराची जागा दिली पाहिजे.

    मी ग्रामीण भागात शिक्षणक्षेत्रात नोकरी करणारी स्त्री आहे. माझ्या अवती-भोवती अशा अनेक स्त्रिया मी पाहत आहे, की ज्या सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, जिल्हा परिषदेत निवडून आल्या आहेत. त्यातील काही स्त्रिया शिकलेल्या आहेत तर काही अशिक्षित आहेत. राजकारणात त्यांना पद मिळालं; पण खरंच त्यांना स्वतंत्रपणे सत्ता चालवण्याचा अधिकार आहे का? बहुतांशी स्त्रिया केवळ नावाला पदावर आहेत. खरी सत्ता त्यांच्या कुटुंबील पुरुषच चालवतात. स्त्रियांना पन्नास टक्के हक्क दिले खरे; पण त्याची ठसठसच जास्त आहे. अर्थात काही स्त्रिया मोठय़ा कर्तृत्वानं राजकारणात काम करतात. स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. त्यांचं स्वागत केलं पाहिजे; पण बहुतांशी स्त्रिया केवळ रबरी शिक्का म्हणून वावरतात त्यांचं काय?

    बाबासाहेबांनी संसदीय लोकशाहीचा विचार करताना आपल्या देशातील सामंतीवर्चस्वाचा टेंभा मिरवणारे, जात आणि धर्माचा झेंडा मिरवणारे पुरुष स्त्रिला दुय्यक ठरवतील, हे विचारात घेतलं होतं म्हणूनच त्यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा आग्रह धरला होता. आपल्या देशातली स्त्री कोणत्याही जातीतली असो ती अतिशुद्रच आहे, हे कुणी ठसवलं? ती ब्राह्मण असो वा दलित; ती शुद्रच आहे हे ठरवणारे कोण आहेत? आपल्या धर्मग्रंथांनी, पोथ्या, पुराणांनी हे ठरवलं असेल तर ते बाद करायला नको का? परंतु, अजूनही धर्मभोळय़ा स्त्रिया आपल्याला दुय्यम ठरविणार्याक कल्पनांनाच उजाळा देताना दिसतात. ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिक वाईट आहे. कुटुंबातील सर्व धार्मिक कर्मकांडं स्त्रियांनी करायचे; पण तिला मंदिरात प्रवेश नाकारायचा असा विरोधाभास आहे. म्हणून ग्रामीण, दलित विशेषत: कष्टकरी महिलांनी आपले सांस्कृतिक आचरण अधिक मानवतावादी, विज्ञानवादी करायला हवं असं मला वाटतं. शेवटी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहेच ना! आपली श्रद्धा अंधश्रद्धेकडं जाणार नाही, याची काळजी आपणच घेतली पाहिजे.

    अलिकडे दलित स्त्रियांचं देवभोळेपण कमालीचं वाढत आहे. याला अपवाद मीसुद्धा नाही; पण मला वाटतं आंबेडकरी स्त्रियांच्या मनातलं देवभोळेपण कमी करण्यासाठी पर्यायी सांस्कृतिक आचरण आपण उभं करण्यात कमी पडलो. मी एक आंबेडकरी स्त्री आहे; पण मला घरातून निघाल्यापासून ते नोकरीच्या ठिकाणी जाईपर्यंत जवळवजळ वीस- पंचवीस मंदिरं लागतात. ती रस्त्यावर असतात. रोज असंख्य स्त्रिया त्यांचं धार्मिक आचरण करताना मी पाहते; पण या प्रवासात विज्ञानवादी आंबेडकरी आचरणाचं धम्मस्थळ मात्र कुठंच भेटत नाही. काय करणार? आंबेडकरी स्त्रियांना मानसिक समाधान देणारी पर्यायी स्थळं आपण उभी करू शकलो नाहीत; अशावेळी आंबेडकरी स्त्री रोज भेटणार्यां धार्मिक स्थळांकडंच जाईल हे नैसर्गिक आहे. आंबेडकरी स्त्रीची स्वत:ची व हक्काची अशी आंबेडकरी सांस्कृतिक विचारपीठं उभी करण्यात आपण कमी पडलो. दलित स्त्रीच्या आजू-बाजूला हळदी-कुंकू, बारसं, मंगळागौर आणि इतर धार्मिक समारंभात सहभागी होता होता तिचंही नकळतपणे हिंदूकरण झालेलं असतं. त्यातून बाहेर पडणं ही एक दिवसाची गोष्ट नाही. याठी प्रबोधन वाढवून तिला वेळ आणि संधीही दिली पाहिजे. हजारो वर्षांची परंपरा नाकारायला काहीसा वेळ लागणार आहेच. आंबेडकर जयंती महापरिनिर्वाण दिन, बुद्ध जयंती, वर्षावास, मंगल परिणय, जलदानविधी याच वेळी तिच्या तोंडात पंचशील येतं; पण रोजच्या व्यवहारात मात्र तिला आरत्या, स्त्रोत आणि भजनं ऐकावी लागतात. यात दोष दलित स्त्रियांचा की पुरोगामी सांस्कृतिक आचरणाच्या आकसलेपणाचा? मला सहज सुचलं म्हणून एक उदाहरण द्यावंसं वाटतं पंधरा-वीस वर्षांपूर्वी कॉम्प्युटर येणारी माणसे खूप कमी दिसायची. तेव्हा संगणक निरक्षरता होती.; पण आता घरोघरी कॉम्प्युटर आले. कुठंही जा संगणकाशिवाय काम होत नाही. प्रत्येकाच्या हातात डिजिटल मोबाईल आले. तेव्हा आज प्रत्येकजण कॉम्प्युटर साक्षर झाला आहे. साधनं वाढली तेव्हा माणसे साक्षर झाली. म्हणून असं वाटतं, की विज्ञानाचा विचार करणारी साधनं वाढली की माणसं अधिकाधिक पुरोगामी होतील. आंबेडकरी विचाराच्या बाबतीत प्रश्न माणसांचा नाही तर प्रश्न आहे त्यांना अभिव्यक्तीसाठी मिळणार्या. साधनांचा.

    आज एकूणच स्त्रियांमध्ये व्हॉटस्अँप, एसएमएस आणि मनोरंजनाची इतर साधनं वापरण्याचं प्रमाण जास्त आहे. शहरातलं जाऊ द्या; पण आता खेड्यांतही हातातली कामं टाकून टीव्हीवरील मालिका पाहणार्या् स्त्रियांची संख्या वाढत आहे. घरातील कामं, मुलांचा अभ्यास, किंवा नोकरीतील कामं दुर्लक्षित करून वॉटस्अँपवर चॅटिंग करणार्याव स्त्रिया पाहिल्या, की मनाला वेदना होतात. दर मिनिटाला मोबाईलवर आलेला मेसेज घेतलाच पाहिजे. ते आपल्या जीवनाचं इतिकर्तव्य आहे, असा दळभद्री विचार महिलांमध्ये वाढतो आहे. अगदी जेवताना, एखाद्या समारंभात असताना, शिक्षिका असेल तर शिकवतानासुद्धा आपलं सारं लक्ष मेसेजकडे देणार्याआ महिला कमी नाहीत. 'सोशल मीडिया'चा वापर जरूर केला पाहिजे; पण तो कसा, केव्हा आणि कशासाठी हे महत्त्वाचं नाही का? बाबासाहेबांनी ज्ञानवृद्धीसाठी वर्तमान पत्रासारख्या माध्यमाचा फार प्रभावीपणे वापर केला होता. हे न विसरता आज आपल्या हातात जी माध्यमं आहेत, त्यांचा वापर ज्ञान मिळविण्यासाठी, समाज पिरवर्तनासाठी, मानता रूजवण्यासाठी करायचा की केवळ क्षणिक विरंगुळ्यासाठी हा विचार सर्व लहान मोठय़ांनी करण्याची वेळ आली आहे.


    आदिवासी, भटक्या आणि विमुक्त जमातीतील स्त्रियांचे प्रश्न तर अधिक जटील आहेत. भारतात अजूनही असे कितीतरी समूह आहेत, की त्यांना आपले हक्क माहीत नाहीत. सामाजिक पर्वितन कशाला म्हणतात, हे त्यांना माहीत नाही. कष्ट करून पोटाची खळगी भरणं एवढंच त्यांचं भावविश्वी आहे. अशा कष्टकरी, उपेक्षित महिलांना सामाजिक न्याय मिळावा, म्हणून बाबासाहेबांनी राज्यघटनेत अनेक तरतुदी केल्या; परंतु त्यांना अज्ञानी ठेवण्यातच इथल्या राजकीय सत्तेचं भलं सामावलेलं आहे. शासनानं घोषित केलेल्या शासकीय योजना अशा उपेक्षित स्त्रियांपर्यंत पोहचत नाही, हे आपल्या लोकशाहीचं दुर्देव म्हणावं लागेल. स्त्री-पुरूष समानतेचे नारे आपण दिले. शासनाच्या पातळीवर अनेक कायदेही तयार झाले; परंतु भारतीय माणसाच्या मनात स्त्री-पुरूष समानता खरच रूजली आहे का? या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. आपल्या अनेक धर्मग्रंथांच्या पाना-पानात स्त्रीला दुय्यम मानलं आहे. तिला शुद्रातिशुद्र मानून आपल्या कर्मठ धर्मग्रंथांनी सतत ही दरी निर्माण केली आहे. बाबासाहेब सातत्यानं धर्मग्रंथांची चिकित्सा करा, असे जे म्हणत होते, त्यात शुद्रातिशुद्र स्त्रियांना न्याय मिळेल असाही एक अर्थ होता. आपल्या समाजात रूजलेल्या पारंपारिक लोककलांमध्ये वावरणार्याद स्त्रियांचे प्रश्नही अधिक गंभीर आहेत. स्त्री जशी चूल आणि मुलाची हक्कादार असते, तशीच ती मनोरंजनाचं, शृंगाराचं ठिकाण असते, अशी एक चुकीची समजूत तयार झाली आहे. तमाशा, लावणी, संगीतबारी, जागरण गोंधळ अशा कितीतरी लोककलांमध्ये नाचणार्यां स्त्रियांकडं समाजानं सन्मानानं पाहिले का? नाही. त्या नेहमीच पुरुषांच्या शृंगारिक भूक भागविणारी ठिकाणं बनल्या. महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या उद्धाराचं कार्य केलं बाबासाहेबांनी फुल्यांच्या विचारांना कायद्याचा आधार देऊन कृतीत आणलं. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे अशा समाजमातांनी स्त्रियांना सन्मान मिळावा, म्हणून आपलं आयुष्य वेचलं; पण महात्मा आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला सन्मान स्त्रिला अजून मिळाला आहे, असं धाडसानं म्हणता येत नाही. अजूनही भारतात असंख्य पुरुषांच्या मनात स्त्रीबद्दल वर्चस्वाच्या पारंपारिक कल्पना आहेत. हे सर्वच पुरुषांच्या बाबतीत नाही; परंतु ज्या पुरुषांच्या मनात स्त्रीबद्दल वर्चस्वभावना आहे, ती वर्चस्वभावना त्यांच्या मनात कुणी टाकली? कर्मठ धर्मग्रंथ, खुळचट परंपरा, अंधश्रद्धा आणि निडर झालेली वर्चस्ववादी समाजभावना यांनी हे सारे अनर्थ केले, असेच म्हणता येईल

    THOUGHTS ON LINGUISTIC STATES