All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    असहिष्णूता संघाचे राजकारण आणि आंबेडकरी आचरण




    आणि संघाचे राजकारणअसहिष्णूता,आंबेडकरी आचरण जेएनयुमधील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्यावर देशद्रोहाचा खटला भरून त्याला देशद्रोही ठरविण्याच्या ज्या राजकीय हालचाली झाल्या त्या पहाता भरतातील सर्वसामान्य जनता वाढत्या असहिष्णूतेच्या वादळात ढकलली जात आहे हे नक्की झाले. याआगोदरच हैद्राबाद युनिर्व्हसीटीत दलित विद्यार्थी रोहित वेमुला याला आत्महत्येला प्रवृत्त करणार्याे शक्ती कोण आहेत? या दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनांनी संसदेला जागे केले. या दोन घटनांचे पडसाद उमतत असतानाच एमआयएम या मुस्लिम संघटनेचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे 'भारत माता की जय म्हणणार नाही' असे भडकावू विधान आले. या घटकांचे बारकाईने निरिक्षण केले तर या घटनांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेचा उल्लेख हे समान सूत्र आहे. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती साजरी करताना देशाच्या अंगावर ज्या जहरी राजकीय घटना घडत आहेत त्यांच्याकडे अत्यंत डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं आणि ती लोकउत्सवाने साजरी करणं ही गोष्ट निश्चिडतच अभिमानाची आहे. हा अभिमान भारतातली दलित जनता गेले पन्नास-साठ वर्ष अनुभवत आहे. त्यासाठी मोहन भागवत यांच्या इशार्यााची आणि मोदी सरकारच्या फतव्यांची निश्चिलतच गरज नाही. सध्या भारतात सांस्कृतिक वर्चस्वासाठी जे राजकारण होत आहे ते पहाता लबाडांचे शेवटचे अस्त्र म्हणजे देशभक्ती आहे असेच म्हणावेसे वाटते.

    '
    भारतीयता तो नागरिकता है हिंदूत्वही राष्ट्रीयता है ' अशा विचारांचा नारा देत 1925 साली विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. बॅ. सावरकर, बॅ. मुंजे आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचारांचा बंच म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे. संघाचे दुसरे सरसंघचालक मा. स. गोळवलकर गुरूजींनी जी भाषणे केली ती एकत्र करून 1966 साली 'बॅच ऑफ थॉटस्' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. हे पुस्तक म्हणजे संघाचे विचारधन आहे. डॉ. हेडगेवारांपासून ते मोहन भागवत यांच्यापर्यंतच्या सर्व सरसंघचालकांनी गोळवलकर गुरूजींच्या आज्ञांचे पालन केले आहे. गुरूजींनी सांगितलेल्या टेन कमांडमेंटस् म्हणजे संपूर्ण भारत हिंदूराष्ट्र बनविण्याचा संघाचा अजेंडा आहे. वंश शुद्ध ठेवण्यासाठी हिटलरचा धडा गिरवा, इश्वारनिर्मित वर्णव्यवस्था हा हिंदु धर्माचा पाया आहे, त्याचे रक्षण झाले पाहिजे. हिंदूत्व, हिंदूराष्ट्र आणि मुस्लिमद्वेष हा राजकारणाचा पाया ठेऊन संघाने 'भारतीय जनसंघ', 'भारतीय जनता पक्ष', 'भारतीय मजदूर संघ', 'अ.भा.वि.प' या संघटना उभारल्या. याशिवाय 'विश्वयहिंदू परिषद', 'स्वदेशी जागरण मंच', 'भारतीय किसान संघ', 'वनवासी कल्याण आश्रम', 'विद्याभारती' याबरोबरच परदेशातही 'हिंदू स्टुडंट कौंसिल', 'सेवा इंटरनॅशनल' यासारख्या शाखा संघाने विस्तारल्या आहेत. 2014 च्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाला जे एकहाती यश मिळाले या यशाने संघाचे मनोधैर्य उंचावले गेले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर संघ सेक्युलर बनेल असे अनेकांना वाटत होते. भाजप आणि संघालाही आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा दाखवायला मोठी संधी भारतीय मतदारांनी दिली आहे परंतू मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या काळात संघाने भाजपच्या रूपाने जे हुकुम सोडले ते पहाता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदलला आहे, असे वाटत नाही. हेडगेवार, गोळवलकरांच्या कडव्या सावरकरी आज्ञा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पून्हा उजळ केल्या आहेत असे आजचे राजकीय चित्र दिसते.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अलिकडच्या भाषणांत त्यांनी वेळोवेळी दिलेल्या हुकुमांचा आणि सल्यांचा अन्वयार्थ लावला की संघाला नेमका कोणता अजेंडा पूढे न्यायचा आहे हे सहज लक्षात येते. 2014 सालच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत झालेल्या विश्ववहिंदू परिषदेच्या पन्नासाव्या वर्धापनदिनी मोहन भागवत यांनी सांगितले की, 'पूढच्या पाच वर्षात देशातील सर्व हिंदूंना एकत्र आणण्याचे प्रयकरायचे आहेत, सर्व हिंदूंच्या पिण्याच्या पाण्याचे, प्रार्थनेचे आणि मृत्यूचे ठिकाण एकच असेल असे प्रयकेले पाहिजे'. त्यानंतर सहा महिन्यांनीच भागवत यांनी गाझियाबादच्या सभेत 'भारत हिंदूराष्ट्र आहे, अशी गर्जना केली. भागवतांच्या या विधानांचा अर्थ म्हणजे भाजप पुरस्कृत 'घरवापसी' आहे. या घरवापसीचे बिजं सावरकरांच्या विचारांत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारतीय राज्यघनेतील समाजवादी समाजरचना हे शब्दनाकारून राज्यघटनेलाच बदलण्याचे राजकारण पूढे येत आहे. राज्यघटनेला प्रमाण मानणार्या  धर्मनिरपेक्ष सहिष्णू हिंदूपूढे भगवत्गीता ठेऊन संघ कोणते मानवी मूल्य स्थापू पहात आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून हिंदू धर्म नाकारला. तो का नाकारला? तर ईश्वारीकल्पना, कर्मकांड, अंधश्रद्धा, जातीप्रथा, वर्ण या सगळया गोष्टींना नाकारून मानवी हक्कांची माणसाच्या प्रतिष्ठेची, समतेची, शांतीची, प्रोची आणि विज्ञानवादी दृष्टीची प्रस्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी केली. डॉ. आंबेडरांनी हिंदूधर्मावर आणि त्यातील सनातनी कर्मठ हिंदूत्वावर जेवढा प्रहार केला.


    अस्पृश्य हिंदूंना त्यांच्या हक्कांचा, न्यायाचा आणि मानवतावादी विचारांचा रस्ता दाखविण्याचे ऐतिहासिक काम भारतीय संविधानाने करून ठेवले आहे. 1919 साली साउथब्युरो कमिटिला साक्ष देताना डॉ. आंबेडकरांनी भारतात केवळ हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिश्च न आणि ज्यू असे केवळ पाच समुदाय नाही, तर हिंदूत सवर्ण हिंदू आणि अपृश्य हिंदू असे दोन स्वतंत्र व भिन्न समुदाय आहेत असे सांगितले. भारतातला जो मोठा म.ागासहिंदू समाज आहे त्याला आकर्षित करून आपली वोट बँक मजबूत करण्याचे काम संघाला करायचे आहे. त्यामुळे घरवापसी, कश्मिर मधील 370 वे कलम, आरक्षणाचे आमिष, योगशिक्षण, गीता शिक्षण, गोरक्षण या सार्या् गोष्टी भाजपाच्या अजंडयावर आहेत.


    महाराष्ट्रात ओबीसी, धनगर आणि मराठा समाजाने आरक्षणाची केलेली मागणी, गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाने सुरू झालेले पाटीदार अनाम.त समाजाचे आंदोलन या गोष्टी उच्चवर्णीय हिंदूंच्या हिताच्या नाहीत. त्यामुळे याबाबत भाजप सरकारला काही ठोस निर्णय घेता येतील, असे दिसत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा या देशातील उच्चवर्णीय ब्राहमणांचे संघटन आहे हे सर्वसामान्य आहे. पण केवळ ब्राहमणांना विरोध करून या देशात सेक्युलर विचार उभा रहातो हा भाबडा समज घेऊन इथल्या परिवर्तनवादी संघटना उभ्या राहिल्या. मुळात ब्राम्हणांना विरोध करायचा की ब्राम्हण्याला विरोध करायचा हे निटपणे न ठरविल्यामुळे भारतातील दलित आणि इतर सेक्युलर संघटना विकलांग बनत आहेत.

    आज देशभरात काही प्रश्न वाघनख्यासारखे विखारी बनले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांचे खून रोज गल्ली-बोळात होणारे जातीय तणाव अभिव्यक्ती स्वातंञ्याची गळचेपी, लोकशाहीत व्यक्तीच्या रोजच्या जगण्यात निर्माण होणारी सनातनी भीती या सर्व गोष्टी समाजसाठी चिंतेच्या बनल्या आहेत. गोमांसबंदी त्यातून मुस्लिमांच्या बांधल्या जाणार्याग आर्थिक नाडया आणि गोहत्येवरून पेटलेला धार्मिक उन्माद या सर्व गोष्टी भारतीय लोकशाहीला, तिच्यातील समाजवादी धर्मनिरपेक्षतेला कुठे घेऊन जाईल याचा नेम नाही.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन येथील घर, दादर येथील त्यांचे बहुचर्चित स्मारक, आरक्षणाला संरक्षण देणार्या  घोषणा या गोष्टी राजकीय आचरण म्हणून स्वागताच्या आहेत. पण त्यापलिकडेही जाऊन भरतातल्या दलित, श्रमिक आणि कष्टकरी माणसाच्या .मनात हक्काचे घर करायचे असेल, तर त्याला नवा विश्वा्स देणे महत्वाचे आहे

    भारतीय राजकारण जसे जसे धर्मकेंद्रित बनेल तसा भारतीय लोकशाहीचा संकोच होत जाईल. भांडवलशाही, जागतिकीकरणानंतरची अवस्था काय असेल, असा प्रश्न अनेक विचारवंतांसमोर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून 'हिंदूत्वाद' हा तिसरा पर्याय असे भासवले जात आहे. पण हा पर्याय जगाला सोडाच पण भारतालासुद्धा लाभदायक ठरेल असे विचारवंतांना वाटत नाही. भारतातील प्रागतिक चळवळींनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन एक होणो अत्यंत महत्वाचे आहे. आंबेडकरी संघटनांनी, आंबेडकरी नेत्यांनी आणि आंबेडकरी लेखक-विचारवंतांनी याची पून्हा नव्याने सुरूवात करायला हवी. या निळया पावलातूनच उद्याची निळी पहाट उगवणार आहे. हे करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणार्यान कट्टरपंथीयांनी पहिल्यांदा व्यापक होणे गरजेचे आहे. 

    डॉ.बाबासाहेब अांबेडकरांनी जातीनिमूर्लनासाठी पहिले पाऊल उचलले ते धर्मचिकित्सेचे. जगभरातल्या धर्मांचा अभ्यास करून त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला म्हणजे मानवतावादी विचारांचा स्वीकार केला. समतेचा, समाजवादाचा आणि न्यायाचा स्वीकार केला. जे धार्मिक आचरण माणसांचे खून करायला सांगते त्या धार्मिक उन्मादाचा नायनाट करण्यासाठीचे कोणत्याही माणसाचे आचरण म्हणजे आंबेडकरी आचरण आहे. मतपेटीतून विचारी माणसे निवडून देता येतात. आपल्याला हा सार्वभौम हक्क बाबासाहेबांनी दिला आहे. तो प्रमाणिकपणे व सद्विवेकाला स्मरूण बजावणो म्हणजे आंबेडकरी आचरण आहे. जागतिकीकरण विषमतेवर उभे आहे पण या लढाईत समाजवादाचे स्वप्न घेऊन दलितांनी उतरणे म्हणजे आंबेडकरी आचरण आहे. जागतिकीकरणाने माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या चांगल्या गोष्टी आणल्या आहेत त्या नाकारण्याचे काही कारण नाही. संगणकाच्या रूपानं मानवी जीवनात जी क्रांती झाली तिला तोड नाही. मोबाईलच्या येण्याने माणसाच्या जगण्यात जी गतीमानता आली तीही महत्वाची आहे. वैद्यकीय क्षेत्रात आलेले नवे नवे तंत्रज्ञान माणसाच्या आरोग्याला वरदान आहेत. उद्योग -व्यापारात आलेले प्रगत तंत्रज्ञान, शेती क्षेत्रात झालेली आधुनिक क्रांती या सार्यात गोष्टींचे स्वागत करायला हवे. त्यामुळे उठसुठ जागतिकीकरणाला विरोध करून चालणार नाही हेही खरे आहे. 

    माध्यमांच्या अविवेकी वापरामुळे अनेकांचे जीवन कसे उध्वस्त होते याविषयी सातत्याने वर्तमानपत्रात बातम्या येऊ लागल्या आहेत. इंटरनेट, व्हॉटस् अँप, फेसबुक, व्टिटर या संदेश माध्यमांतून समाजात अनेक विघातक कृती होताना दिसत आहेत. व्हाटस् अँप वरील मेसेजमुळे पती-पत्नीत घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. फेसबुक आणि इतर संवाद माध्यमांवरील चॅटींगमुळे आपले सांस्कृतिक आचरण धोक्यात येत आहे या गोष्टींचा अत्यंत गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. बहुजन समाजातीलमुला-मुलींनी या नव्या आयुधांचा वापर आपल्या सांस्कृतिक विकासासाठी व ज्ञानप्राप्तीसाठी केला नाही तर ही नवी साधणे आपल्या विनाशाची कारणे बनतील. आपल्या सामाजिक विकासासाठी, राष्ट्रविकासासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे त्या तंत्रज्ञानावर स्वार होणे, विज्ञानवादी दृष्टीकोन घेऊन नवा बुद्धीवाद विकसित करणे म्हणजे सम्यक आचरण आहे.
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES