All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    उपासमारीनं शरीराचं पोषण कमी झाल्यानं माणूस हीनबल होऊन अल्पायुषी होतो


    उपासमारीनं शरीराचं पोषण कमी झाल्यानं माणूस हीनबल होऊन अल्पायुषी होतो; मात्र शिक्षणाच्या उपासमारीनं तो निबरुद्ध राहिल्यास जिवंतपणीच तो दुसर्याोचा गुलाम बनतो आणि आयुष्यभर आपलं व आपल्या पिढीचं जीवन गुलामगिरीत घालतो. विशेषत: वंचित उपेक्षित, दलित, पीडित यांची शिक्षणाबद्दलची बेफिकीरवृत्ती ही त्यांना अत्यंत घातक वाटत असे, म्हणून डॉ. आंबेडकरांनी सांगितलं होतं, की जर त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं, तर त्यांची प्रगती होईल. त्यांना शासन, प्रशासनात काम करण्याची संधी मिळू शकेल. शिक्षणामुळं शासनात काम करण्याची संधी मिळाली, तर शासनाचे धोरणात्मक निर्णय प्रभावित करण्याचं बळ मिळेल व यामुळं मागासवर्गीयांच्या विकासाला चालना मिळू शकेल. त्यामुळंच बाबासाहेबांनी शिक्षण सर्वांना मिळावं, असा आग्रह नेहमीच धरलेला होता. शिक्षणाच्या निमित्तानं जेव्हा ते परदेशामध्ये गेले, तेव्हा त्यांनी तेथील शासन, प्रशासन व्यवस्था व बौद्धिक जीवन जवळून पाहिलं. उद्या जेव्हा आपला देश स्वतंत्र होईल, तेव्हा आमच्यासह जे मागास आहेत, त्या सर्वांचे मानवी हक्क केवळ शिक्षणानंच शाबूत राहतील, असं त्याना वाटत असे; मात्र शिक्षणातील आपल्या बांधवाच्या दुर्लक्षितपणाची जाणीव त्यांना नेहमी सतावत होती. त्यामुळं आपल्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी शक्य त्या प्रत्येक साधनाचा उपयोग केला. १९२४ मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. ही संस्था स्थापन करण्याचा त्यांचा एवढाच उद्देश होता, की तिच्यामार्फत वसतितगृह उघडून दलितांत शिक्षणाचा प्रचार, प्रसार करणं, वाचनालय, समाज केंद्रं किंवा अभ्यास मंडळ स्थापन करून दलित समाजात संस्कृतीच्या प्रचाराचं प्रचालन करणं. या संस्थेच्या मार्फत बाबासाहेबांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं. 'शिक्षण ही आजची मोठी गरज आहे. वेळ आली तर उपाशी राहा; पण मुला-बाळांना शिकवा. शिकेल तोच टिकेल,' असं ते म्हणत.

    बाबासाहेबांनी आपली संपूर्ण हयात अस्पृश्यता, जातियता निमूर्लनसाठी घालवली. वर्ग-जात आणि व्यक्तित्व यांच्यासंदर्भात सर्व हितसंबंधांना भेद देऊन ते बहुसंख्यांच्या कल्याणासाठी जीवनभर झिजले. येथील वंचित, शोषित, पीडित, दलित समाजाचं शिक्षण झालं पाहिजे, हा त्यांचा आग्रह यासाठीच होता. त्यांनी 'शिका, संघटित व्हा. संघर्ष करा' या तीन तत्त्वांचा कायम पुरस्कार केला. त्यांच्या या तत्त्वातच शिक्षणाचं सार सामावलेलं आहे. त्यांच्या दृष्टीने शिकणं शोषणमुक्तीची पायवाट होती. संघटित होणं म्हणजे एक विशिष्ट ध्येयासाठी संघटन बांधणं आणि संघर्ष म्हणजे क्रियाशील होणं होतं. भारतातील दलित, पददलितांच्या दैन्यावस्थेवर उपाय म्हणजे शिक्षण हा रामबाणम उपाय होता. जेव्हा बाबासाहेबांनी अमेरिकेत शिक्षणासाठी असताना त्यांनी वडील रामजी सुभेदार यांच्या मित्राला पत्र लिहिलं होतं. त्यातही त्यांनी दीन-दलिताचं दैन्य संपविणारा एकमेव मार्ग म्हणजे त्याचं शिक्षण होय. कार्यकर्त्यांनी शिक्षणासाठी झटलं पाहिजे, असाही त्यांचा आग्रह होता. शिक्षण म्हणजे ज्ञान आणि प्रज्ञा यांचा सुरेख संगम आहे, असंही ते म्हणत. त्यांनी शिक्षण हे मूल्याधिष्ठित म्हणजेच उच्चतम नैतिक आचरण निर्माण करणारं असावं. याबाबत त्यांनी, जो आपल्या पत्नी आणि अपत्यांपेक्षाही शिक्षणावर अधिक प्रेम करतो, तो खरा शिक्षणप्रेमी. लोकशाहीसाठी सुशिक्षित समाजाची अत्यंत गरज आहे, असं त्यांना वाटत असे आणि म्हणूनच या लोकशाही देशात झपाट्यानं समाजातील उपेक्षित, वंचित वर्गात शिक्षणाचा प्रचार-प्रसार काही प्रमाणात झाला.

    त्यांच्या विद्ववतेबदल तर सांगायलाच नको. त्यांनी कधी उपाशी राहून तर कधी पावाच्या तुकड्यावर अहोरात्र अभ्यास केला. त्यांनी कधी आपल्या जीवनात चैन केली नाही, कुठं व्यर्थ वेळ दवडला नाही. त्यांचा रिकामा वेळ वाया जात असेल, तर म्हणायचे मी हे काय करीत आहे, अभ्यास करायचे सोडून मी चैन करीत बसलो, फुकट वेळ दवडू लागलो तर कसं होणार, मी सर्व विषयांचा आमुलाग्र अभ्यास केला, तरच मी जगातील पंडितांच्या रांगेत बसू शकेल. नुसत्या पदव्या मिळविण्यासाठी अभ्यास केला, तर सामान्य दर्जाचं आयुष्य घालवीत बसेन, म्हणून त्यांनी उच्चविद्याविभूषित होण्याची धडपड चालवली. एम. ए. साठी बाबासाहेब अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले होते. त्यांना केवळ पदव्या मिळवायच्या नव्हत्या, तर अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळवायचे होतं. या विषयांचा सखोल अभ्यास करुन कोलंबिया विद्यापीठला १५ मे १९१५ रोजी 'अँडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी' हा प्रबंध सादर केला. दोन जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम. ए. ची पदवी मिळाली. दरम्यानच्या काळात कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात त्यांची पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्याशी ओळख झाली. बाबासाहेब ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वांत शेवटी बाहेर पडत असत. असा विद्यार्थी कोण, याची उत्सुकता लाला लजपतराय यांना होती, म्हणून ते त्यांना भेटायला आले होते. असेच एकदा तेथे दोन भारतीय विद्यार्थ्यांचा संवाद सुरू असताना प्राध्यापक सेलिग्मन तिथं आले. त्यांनीसुद्धा या दोघांच्या संवादात भाग घेतला. प्राध्यापक एडविन सेलिग्मन हे बाबासाहेबांच्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचं सखोल ज्ञान ऐकून होते. त्यांनी बाबासाहेबांबद्दल गौरवपर उद्गार काढले होते. ते म्हणाले, ''भीमराव आंबेडकर हिंदी विद्यार्थ्यांमध्येच केवळ श्रेष्ठ आहेत असं नाही, तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येसुद्धा ते श्रेष्ठ आहेत.'

    कोलंबिया युनिव्हार्सिटीमध्ये समाजशास्त्र प्राध्यापक डॉ. ए. ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावरील चर्चासत्रात आपला शोधलेख वाचण्याची संधी त्यांना नऊ मे १९१६ रोजी मिळाली. त्यानुसार भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी उं२३ी ्रल्ल कल्ल्िरं. ळँी्र१ टीूँंल्ल्र२े, ¬ील्ली२्र२-ल्ल िऊी५ी'स्रेील्ल३ हा शोधनिबंध वाचून समाजशास्त्राच्या सार्या च विद्वानांचं त्यांनी लक्ष वेधलं होतं. ळँीेी१्रूंल्ल ख४१ल्लं' ा र्रू'ॅ८ या समाजशास्त्राच्या नियतकालिकामध्ये डॉ. आंबेडकरांच्या जातीवरील प्रबंधाचा निवडक भाग जगातील उत्कृष्ट वाड्मय असलेल्या ह१'२ि इी२३ छ्र३ी१ं३४१ी या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. या सन्मानार्थ कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी एक मेजवानीही डॉ. आंबेडकरांना दिली होती. विशेषत: विद्यार्थ्यांच्या बाबतीत बाबासाहेब कमालीचे सजग होते. ते स्वत: स्वत:ला जीवनभर विद्यार्थी संबोधत. कारण त्यांनी संपूर्ण हयातभर अभ्यास केला. त्यांची ग्रंथ संपदा एवढी विपूल होती, की ते फक्त आपल्या जीवनात पुस्तकाशिवाय दुसरं काहीच खरेदी करत नसत. ते विद्यार्थ्यांंना संबोधतांना म्हणत, 'विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षा हेच एकमेव ध्येय बाळागायला हवं. विद्यार्थ्यांंनी शिक्षण घेऊन नंतर स्वावलंबी व्हायला हवं. शिक्षण घेताना कोणत्याही राजकीय पक्षांच्या, नेत्यांच्या जाळ्यात अडकू नये. विद्यार्थ्यांंनी जीवनात उच्च शिखर गाठलं पाहिजे. आपल्यातील वक्तृत्व कला विकसित केली पाहिजे. चिकाटीनं अभ्यासाची सवय लावून घेतली पाहिजे. आपल्यातील इतर कला, गुणांचा विकास केला पाहिजे.' शिक्षण व विद्या या गोष्टींशिवाय आपला उद्धार होणार नाही. तुम्ही भरपूर वाचन केलं पाहिजे. रोज अर्धे पुस्तक संपविण्याचा सराव तुम्ही केला पाहिजे, असं बाबासाहेब विद्यार्थ्यांंना सांगत. राजकीय, सामाजिक चळवळीचा भलामोठा व्याप सांभाळत बाबासाहेबांनी शिक्षणप्रसाराचं, शिक्षण संस्था उभारण्याचे, नवीन पिढी घडविण्याचे, शिक्षणाबद्दल जागृती निर्माण करण्याचं बहुमोल कार्य खास वेळ काढून केलं.

    औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाचं स्वप्न साकार झाल्यावर बाबासाहेब म्हणाले होते, 'शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी काहीतरी करावं, हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. माझं स्वप्न मी सत्यसृष्टीत आणू शकलो, याचा मला आनंद होत आहे. त्यांना अभ्यासशिवाय काहीच प्यारं नव्हतं. ते त्यांचा कोलंबिया विद्यापीठातील अभ्यासाच्या सवयीबद्दलचा सांगतात, तो प्रसंग असा आहे. कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांनी अभ्यासाकडं लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केल्यावर सवयीच्या अभावी सुरवातीला त्यांना अभ्यासाचा कंटाळा येत असे; परंतु चिकाटीनं त्यांनी अभ्यासाची सवय लावून घेतली. रात्री शेजारच्या खोल्यांमध्ये अन्य विद्यार्थ्यांंचा हसण्याखिदळण्याचा गोंगाट होई. तेव्हा ते कानात कापसाचे बोळे घालून अभ्यास करीत. त्यांनी अभ्यासाची वेळ दररोज थोडी-थोडी वाढवून सहा महिन्यांत ते बारा तास अभ्यास करू लागले. आपल्या अभ्यासक्रमातील विषयांवर या काळातच त्यांनी प्रभुत्त्व मिळविलं होते. अखंड अभ्यासाच्या दृढनिश्च यातून पुढं ते सोळा ते अठरा तास अभ्यास करीत. शाळेत असतानाच त्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व मिळविलं होते. त्याचं श्रेय बाबासाहेबांनी आपल्या वडिलांना दिलं होतं. त्याबाबत बाबासाहेबांनी म्हटलं आहे, 'वडिलांना इंग्रजी शिकविण्याची फार हौस होती. ते मला नेहमी सांगत,हार्वर्डची पुस्तकं तोंडपाठ करून टाक. त्यांनी त्याप्रमाणं तर्खडकरांची भाषांतर पाठमालेची तीन पुस्तकं पण त्यांनी माझ्याकडून तोंडपाठ करवून घेतली होती. मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द शोधून काढण्यास व त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्यासही माझ्या वडिलांनीच मला शिकविलं. मी इंग्रजी चांगलं बोलतो व लिहतो, अशी माझी थोडीबहुत ख्याती आहे, असं मला वाटतं; पण योग्य शब्दांचा तोलून मोलून उपयोग कसा करावा, हे माझ्या वडिलांनी मला जसं शिकविलं, तसं इतर कोण्याही मास्तरांनी मला शिकविलं नाही. तर्खडकरांच्या पुस्तकातून उलटसुलट शब्द विचारून ते माझ्या ज्ञानाची नेहमी चाचणी करीत. त्याचप्रमाणं इंग्रजी वाक्प्रचार व योग्य भाषाशैली कशी वापरावी, हेही त्यांनीच मला शिकविले.'

    डॉ. बाबासाहेबांनी आयुष्यभर शिक्षणासाठी आपले आयुष्य झिजविल्यानं ते या देशातील सर्वोच्च विद्वान ठरलं आणि म्हणूनच त्यांना या देशाची राज्यघटना लिहिण्याची संधी प्राप्त झाली आणि एका मागास जातीत जन्मलेल्या या हिर्याीनं या देशाचे सर्व कायदे-कानून घटनेच्या माध्यमातून तयार करून आपल्या सर्वांंच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली. त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळंच आपणास मुक्त शिक्षणाची संधी प्राप्त झाली. डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटनेत शिक्षणाच्या संदर्भात अनेक तरतुदी करून ठेवल्या. राज्य घटनेच्या कलम ४५ मध्ये सहा ते चौदा वर्षांंपर्यंंत शिक्षण हे सक्तीचं व मोफत असायला हवं, अशी तरतूद आहे; पण अद्यापही अनेक समूह यापासून वंचित आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा प्रचार, प्रसार खूप झाला. शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठांची संख्या वाढली, तरी निरक्षरांची संख्या मोठी आहे. १९९१ च्या जणगणनेनुसार ती ४६ टक्के एवढी होती. स्त्रियांची साक्षरता ५२.3२ टक्के एवढी होती, तर २९ टक्के मुलं शाळेच्या बाहेर होती. यामध्ये आता थोडी प्रगती झाली आहे, तरी आणखी व्हावी तेवढी प्रगती होऊ शकलेली नाही. ग्रामीण भागात अर्धवट शिक्षण सोडत असलेल्या मुलींची टक्केवारी दखलयोग्य आहे. गरिबांच्या मुलांना अद्यापही गरिबीमुळं शिक्षणाच्या विशेषत: उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येता येत नाही. यासाठी डॉ. आंबेडकरांचे शिक्षणासंबंधीचे मूलभूत चिंतन पुन्हा सर्वांंनी अभ्यासण्याची गरज आहे. याबद्दल अशा समूहात शिक्षणाच्या संदर्भात मोठं काम करण्याची गरज आहे, तरच त्यांनी संविधानात केलेल्या तरतुदींना न्याय मिळेल.

    (लेखक 'यशदा' पुणे येथे संशोधन अधिकारी (प्रकाशन) आहेत)

    (मो. ९८२३३३८२६६)


    THOUGHTS ON LINGUISTIC STATES