All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    कलाप्रेमी


    कलाप्रेमी बाबासाहेबव्हायोलीन प्रेमी बाबासाहेब


    एकीकडे देशासाठी, समाजासाठी चंदनाप्रमाणो झिजत असताना बाबासाहेब वैयक्तिक छंद सुद्धा जपत असत. वाचन, मनन आणि कलेची आवड यातून बाबासाहेबांनी वयाच्या ६0 व्या वर्षी व्हायोलीन शिकण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थ विद्यालयातील ग्रंथालय अधिकारी रेगे यांनी बळवंत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवण्यासाठी पाठवले. रेगे आणि त्यांचे मोठे बंधू दोघेही बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवायचे. 'बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला शिकवणो कसे जमणार म्हणून अनिच्छेने आम्ही शिकवण्यास गेलो, पण बाबासाहेबांच्या मनमिळाऊ आणि खेळकर स्वभावामुळे आमचे दडपण दूर झाले', असे साठे अभिमानाने सांगतात. साठे बाबासाहेबांना त्यांच्या वेळेनुसार राजगृहावर व्हायोलीन शिकवत असे. बाबासाहेबांनी २ वर्ष हे तंतूवाद्य शिकून घेतले आणि आपल्या फावल्या वेळेत ते हे वाजवायचे. 'खूप दुख: भोगलेली माणसे व्हायोलीन उत्तम वाजवतात असे मी कुठेतरी वाचलेले आठवतंय. व्हायोलीनमधून निघणारा स्वर एक वेगळ्या प्रकारचे तरंग मनात निर्माण करतो.'असे बाबासाहेब म्हणत. १९५१ ते १९५३ या कालावधीत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवण्याचा सन्मान मिळाला. पहिल्या दिवशी त्यांनी बाबासाहेबांना सांगितले कि, व्हायोलीन हे तंतूवाद्य प्रकारातला सर्वात कठीण प्रकार आहे.

    बाबासाहेबांनी लागलीच व्हायोलीन बद्दलची सर्व साहित्य मागवली आणि रीतसर अभ्यास सुरु केला, व्हायोलीन : हाऊ टू मास्टर इट हे पुस्तक स्वत: साठे यांनी बाबासाहेबांना दिले होते. संगीताबद्दलचे त्यांचे प्रेम आणि शिकण्याची प्रबळ इच्छा मी पहिल्यांदा कुणामध्ये पाहत होतो असे साठे सांगत असे, पण त्यांचे शरीर त्यांच्या मेहनतीला साथ देत नव्हते. व्हायलीनचा बो खूप वेळ ते धरू शकत नव्हते. त्यांचा हात दुखून येई मग ते थोडी विश्रांती घेत आणि पुन्हा सराव करत. थोड्याच कालावधीत बाबासाहेब फार उत्तम व्हायोलीन वाजवू लागले, असे साठे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. बाबासाहेब काही काळाने दिल्लीत स्थलांतरित झाले तेव्हा तिथे सुद्धा त्यांनी मुखर्जी नावाच्या व्हायोलीन शिक्षकाला रुजू केले होते, अशी माहिती आहे.

    बाबासाहेबांच्या घरात कामात मदत व्हावी म्हणून एक १२ वर्षाची मुलगी येत असे. तिचे नाव वनस्पती दुर्गत. ती बाबासाहेबांची आठवण सांगताना म्हणते कि, बाबासाहेब व्हायोलीनचा सराव करायला लागले कि, मी रमाईच्या खोलीत त्या सुरावर नाचत असे. रमाईला फार गम्मत वाटे. त्या कधीच माझी तक्रार करत नसे. उलट प्रेमाने मला जवळ घेत. बाबासाहेबांशी जास्त बोलणो होत नसे. पण कशी आहेस, जेवलीस का ? अशी विचारपूस करायचे. बाहेर निघताना माझ्या गालावर, डोक्यावर प्रेमाने थोपटत आणि सांगत आईला त्रास देऊ नकोस.


    - चित्रकार बाबासाहेब -

    बाबासाहेबांनी एकदा कुठल्या गोष्टीचा ध्यास घेतला की, ते पूर्ण केल्याशिवाय सोडीत नसे. बाबासाहेब जितके कठोर, शिस्तप्रिय होते तितकेच ते रसिक आणि मृदू स्वभावाचे होते हे यातून दिसून येते. बाबासाहेबांचा हात व्हायोलीन वाजवताना दुखू लागला. काही काळाने त्यांनी व्हायोलीन वाजवायचे थांबवले परंतु त्यांना आता चित्रकलेत आवड निर्माण झाली. बाबासाहेबांनी चित्र काढण्यास, शिकण्यास सुरुवात केली. बाबासाहेब फार सुंदर चित्र काढत आणि घरातील नोकरांची पहिली दाद मिळवत, 'साहेब, चित्रात जणू जाणच ओतलीत' असे ते म्हणताच बाबासाहेबांना आनंद होत असे. ते गालातल्या गालात हसत. बाबासाहेबांनी रेखाटलेले डोळे उघडे असलेली गौतम बुद्धांचे चित्र अजूनही औरंगाबादला ठेवली आहे.

    सुंदर चित्र आणि स्थापत्य कलेचा उत्तम नमुना बाबासाहेबांना आकर्षित करत असे. शिल्प कला, सुंदर इमारतीचे बांधकाम याबद्दल बाबासाहेब आपल्या गप्पांमध्ये चर्चा करत असे. 'एखाद्या कलेचे कौतुकसुद्धा भारतात जातीय दृष्टीकोनातून पाहिले जाते आणि अशा प्रवृत्तीमुळे कला दाबली जात आहे, संपुष्टात येत आहे,' अशी ते तक्रार करत. माणसाने अशा जातीत जन्म घ्यावा जिथे कुठल्या न कुठल्या कलेचा वारसा आहे.

    - पुस्तकप्रेमी बाबासाहेब-

    बाबासाहेबांचे घर म्हणजे काही वाडा वगैरे नव्हता; पण एखाद्या राजाप्रमाणो थाट मात्र होता. बाबासाहेबांच्या राजगृहात भले मोठे ग्रंथालय, हे त्यांच्या पुस्तकप्रेमाची साक्ष होते. कित्येक उंची बुटांचे जोड, निरनिराळे विविध प्रकारचे फाउंटन पेन बाळगणो बाबासाहेबांची विशेष आवड़ तसेच उंची कोट आणि टोपी ते बाळगत. 

    दुर्मिळ चित्रांचे संकलन त्यांच्या विजयी व्यक्तिमत्व आणि आयुष्यातील अडथळ्यांची त्यांनी उडवलेली दाणादाण याचे पुरावे होते. असे वाटायचे की, उंची राहण्यात, दर्शवण्यात त्यांचा एक सुप्त आनंद होता. बाबासाहेब सिगारेट दारुपासून कायम दूर राहिले. इतर सर्व प्रकारच्या लोकांच्या सानिध्यात राहून सुद्धा त्यांनी स्वत:ला निर्व्यसनी ठेवले होते.

    बाबासाहेबांचे पुस्तकप्रेम त्यांना समाजातील इतर करमणुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवत होते. नाही म्हणायला त्यांनी काही सिनेमे पाहिले होते. रमाई सोबत त्यांनी वल्लू'ी ळे हा सिनेमा पहिला होता. ' अछुत कन्या' हा हिंदी सिनेमा पाहताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या दुस्र्या. पत्नी डॉ. शारदा कबीर यांच्या सोबत त्यांनी ड'्र५ी१ ळ६्र२३ हा सिनेमा पहिला होता.

    - क्रिकेटप्रेमी बाबासाहेब -

    बाबासाहेबांना क्रिकेट खेळ खूप आवडायचा. ते तरुण वयात खुपदा खेळायचे. पहिल्या पत्नी सोबत त्यांच्या माहेरी धारवाडला आल्यानंतर ते तेथील वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी क्रिकेटचे सामने भरवत असत आणि स्वत: सुद्धा भाग घेत असत. विशीत असताना बाबासाहेब पत्ते (ूं१२ि, १ं४ल्ल ि३ँी ु१्रॅिी ) सारखे खेळ खेळत. मित्रांसोबत व्यायाम म्हणून किंवा बदल म्हणून बाबासाहेब समुद्रात पोहण्यास सुद्धा जात असत.

    -प्राणीप्रेमी बाबासाहेब-

    बाबासाहेबांच्या हस्ताक्षाराला एक वेगळी शैली आणि अंदाज होता. फार सुंदर पद्धतीने ने पेन चालवायचे. खूप लोक त्यांच्या अक्षराची प्रशंसा करायचे. बाबासाहेबांना कुत्रांची फार आवड होती. एखाद्या वेगळ्या वंशाचा कुत्रा त्यांना हवा असल्यास ते देशाच्या कानाकोपर्याषत चौकशी करत. त्यांनी पाळलेल्या टोबी कुत्रा आणि हरणाच्या पाडसावर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांना त्यांचा खूप लळा लागला होता. दामोदर हॉलवर वस्तीला असताना बागेत ते तासंतास या दोघांसोबत खेळत असत. त्यांना भरवत असत. एकदा त्यांचा लाडका कुत्रा टोबी जेवण करत नव्हता. बाबासाहेबांनी खूप प्रयकेला पण तो जेवला नाही. बाबासाहेब त्याला विचारायचे 'अरे कशासाठी हा सत्याग्रह आणि उपोषण ?' बाबासाहेबांना खूप वाईट वाटायचे ते सुद्धा त्या दिवशी जेवत नसत.

    -माणुसकी जपणारे बाबासाहेब-

    एकदा प्रवासात आपल्या सोबत असलेल्या सहकारी कार्यकर्त्याकडे पांघरून नव्हते तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्याकडील चादर त्याला दिली आणि झोपायला सांगितले. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा बाबासाहेबांच्या अंगावर काहीच नव्हते. फक्त वळकटी अंथरून ते झोपले होते. त्याने विचारले असे का केले ? तेव्हा बाबासाहेब म्हणाले 'माझ्याकडे एकच होती ती मी तुला दिली' तो अनुयायी काहीच बोलला नाही. पण डोळ्यात अश्रू मात्र चमकले. एकदा कुणीतरी जवळचा सहकारी साहेबाना भेटायला आला, त्यावेळी नेमके घरात कुणी नव्हते. बाबासाहेब स्वत: स्वयंपाक घरात गेले आणि चहा बनवायला घेतला, पण त्यांना दुधाचे भांडे काही सापडेना. त्यांनी मित्राला विचारले 'काळा चहा घेतोस न रे बाबा ?' मित्र म्हणाला 'बहुतेक वेळा मी बिन दुधाचा चहा घेतो' बाबासाहेब मिश्किलपणो म्हणाले, 'पण आपल्या आयुष्यात दुधाचा साठा एकदा तरी मिळालाच पाहिजे' असे बोलून बाबासाहेबांनी पावाचे दोन तुकडे केले (४िु'ी १३्र), मित्र एवढा पाव नको म्हणताच बाबासाहेब हसून म्हणाले अरे समान हक्कांसाठी तर आपली लढाई आहे आणि दोघे गप्पांमध्ये रंगून गेले.

    एकदा संध्याकाळी बाबासाहेब घरी परतत असताना त्यांना थंडीने कुडकुडत बसलेला एक वृद्ध गृहस्त दिसला. बाबासाहेबांना त्याची दया आली. बाबासाहेब त्याच्याजवळ गेले आपला उंची कोट काढून त्याच्या अंगावर टाकला. त्याला मिठी मारली आणि म्हणाले 'तुमच्यासारखे या समाजात कित्येक लोक आहेत, आपल्याला जमेल तेवढे प्रत्येकाने करायला पाहिज' असे बोलून बाबासाहेब निघून गेले.बाबासाहेबांची करुणा आणि दुसर्यााचे दुख: आपले मानण्याचा स्वभाव त्यांना बोधीसत्व पदापर्यंत घेऊन जातो.

    बाबासाहेब संसारात लक्ष देत नाहीत. कधी विचारपूस करत नाहीत. फक्त काम, काम आणि समाज एवढच करत असतात म्हणून रमाई आंबेडकर या काहीशा नाराज असत आणि त्यावरून उभयतांत थोडी फार भांडणो होत असत. एकदा असेच रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या 'कधी तरी घरात लक्ष द्या, काय आहे काय नाही, भाजी पाला, धान्य आहे कि नाही हे पहाव' ते ऐकून बाबासाहेब तडक बाहेर गेले आणि ६ - ७ भाजीच्या जुड्या आणि १00 - १२५ बोंबीलच्या काड्या घेऊन आले. ते पाहून त्यांच्या आत्या हसत म्हणाल्या, 'भीमा अरे एवढी भाजी आणलीस? खराब होईल ती. एक दिवसात संपणार आहे का '?

    - बुद्धं सरणं गच्छामि - 

    बाबासाहेबांना मधुमेहाने हैराण केले होते. त्यांचे शरीर त्यांना तसे संकेत देत असावेत म्हणून मरणापूर्वी बाबासाहेब आपल्या अत्यंत निकटचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांना एका पत्रात म्हणतात, 'भाऊराव मी आता जास्त काळ नाही जगणार. तुम्ही मनाची तयारी करून ठेवा'. या एका वाक्याने भाऊरावांची काय अवस्था झाली असेल हे भाऊरावच जाणतात. 

    शोषित पीडितांच्या उत्कर्षासाठीच त्यांना दीर्घ आयुष्य लाभले असावे असे बाबासाहेब गमतीने म्हणत असत आणि हाच विश्वामस बाबासाहेबांना त्यांच्या शारीरिक विकार आणि त्रासावर मात करण्यास बळ देत असावा. मृत्यूच्या आधी काही दिवस एका निवांत संध्याकाळी साहेबांचा सेवक नानाकचंद रत्तू बाबासाहेबांच्या सोबत होता. बाबासाहेबांनी नानाकचंद रत्तूला डोक्यात तेल घालून मसाज करण्यास सांगितले. बाबासाहेबांना थोड बरं वाटलं. बाबासाहेब काहीतरी गुणगुणत होते. हळू हळू रत्तूला आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला बुद्धं सरणं गच्छामि बुद्धं सरणं गच्छामि''

    बाबासाहेबांनी नानकचंद रत्तुला त्यांचे आवडते बुद्धगीत रेकॉर्डवर लावण्यास सांगितले. असे आपले बाबासाहेब, नारळासारखे, वरुन कठोर, शिस्तप्रिय, गंभीर वाटणारे ..आणि आतून गोड पाण्यासारखे आणि मृदू, रसिक, निर्मळ आणि मिश्किल स्वभावाचे.. कामाच्या ओझ्याने आणि समाजाच्या चिंतेने स्वत:च्या तब्येतीची काळजी न घेणारे.. लाडकी पत्नी आणि मुले यांना सामाजिक कार्यबाहुल्यामुळे पुरेसा वेळ न देऊ शकणारे, हळवे, दयाळू, मनमिळाऊ आणि जिंदादिल..आपले बाबासाहेब.. !!
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES