बाबासाहेब आंबेडकरजयंती विशेषबाबासाहेबांचं व्यक्तिमत्व कोणत्याच पारंपारिक
परिमाणात बसणारं नव्हतं. वंचित समाजात जन्म घेऊनही केवळ ज्यांच्यावर अन्याय झाला
आहे, अशा काही जातींचा उद्धार, त्यांच्यावर लादलेल्या गुलामगिरीचा अंत एवढाच बाबासाहेबांच्या
स्वातंत्र्याचा अर्थ नव्हता. कारण ते कुणा एका घटकाचे नेते नव्हते. ते पूर्ण
देशाचे नेते होते. अस्पश्यच्या मुक्तीचं स्वप्न पाहताना हा महात्मा हिंदू धर्मातील
सवर्ण स्त्रियांच्या गुलामीचा, शोषणाचा आणि त्यांना
देण्यात येणार्याच विषमतेचा वागणुकीचा मुळीच विसर पडू देत नाही.भारतर▪डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक आश्चतर्य होतं. त्यावेळच्या अत्यंत
अंधश्रद्ध भारतात जन्माला येऊनही ते इतके कडवे विज्ञाननिष्ठ संशोधक कसे झाले, हेच मोठं कोडं आहे. त्या काळात समाजात
अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा होता. तो केवळ सवर्णात होता, असं
नाही तर ज्या वंचित समाजात त्यांचा जन्म झाला, त्या
समाजावरही धर्ममार्तंडांनी जाणीवपूर्वक हे जाळं टाकून ठेवलं होतं. बाबासाहेबांच्या
विद्वत्तेबद्दल आणि अद्वितीय बुद्धीबद्दल नेहमी ऐकतो; परंतु
त्यातील वेगळेपणही लक्षात घेतलं पाहिजे. ते केवळ पारंपारिक पद्धतीचे बुद्धीजीवी
नव्हते. त्यांचा स्वभाव मुळातच एका संशोधकाचा असल्यानं कोणतीही गोष्ट कुणाचं तरी
मत म्हणून त्यांनी स्वीकारली नाही. किंवा माझं मत म्हणून हेच योग्य अशी मांडली
नाही. स्वतंत्र संशोधन करून ती गोष्ट मनाला, विशेषत:
बुद्धीला पटल्याशिवाय ते स्वीकारत नसत. कोणत्याही विषयावर स्वत:चं मत देतानाही 'मी सांगतो म्हणून ऐका' अशी त्यांची भूमिका
नसे. आपल्या प्रतिपादनाला त्यांच्याकडं तर्काचा, सबळ
पुराव्यांचा आधार असे. एखाद्या कसलेल्या वकिलासारखं ते आपला मुद्दा तर्कशुद्धपणे
मांडत असत. त्यांच्या काळातील कोणत्याही नेत्याला बाबासाहेबांचा मुद्दा तर्काच्या
आधारावर खोडून काढता येत नसे.
'स्वातंत्र्य' या संकल्पनेबद्दलही त्यांचं चिंतन इतरांपेक्षा वेगळे होतं. ज्या ब्रिटिशांमुळं पाचशेच्या आसपास असलेली छोटीछोटी राज्यं, संस्थानं एका झेंडयाखाली आली, ज्यांच्यामुळं भारतीयांना प्रथमच आधुनिक शिक्षण उपलब्ध झालं, तंत्रज्ञानातील अनेक सुधारणांचा फायदा झाला, ज्यांच्यामुळं हजारो वर्षांत प्रथमच कोटयवधी अस्पश्यना शिक्षण मिळण्याची निदान शक्यता तरी निर्माण झाली, त्या इंग्रजांना फक्त हाकलून देऊन त्या खुच्र्या आपण वाटून घ्यायच्या, अशी बाबासाहेबांची कल्पना मुळीच नव्हती. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य हे अत्यंत महत्वाचं जीवनमूल्य होतं. अत्यंत प्रतिगामी आणि कुटील पद्धतीनं धार्मिक रुढींमार्फत लादलेल्या गुलामगिरीतून कोटयवधी माणसांची मुक्ती ही बाबासाहेबांची स्वातंत्र्याची संकल्पना होती. इतर बहुतेक नेत्यांना प्रामुख्यानं राजकीय स्वातंत्र्य हवं होतं. त्यांना आपल्याच देशातील प्रचंड लोकसंख्येच्या हजारो वर्षांपासूनच्या वेदनेशी, दु:खांशी काही देणं-घेणं नव्हतं भारतीय स्वातंत्र्यलढयापेक्षा बाबासाहेबांचा स्वातंत्र्यलढा जास्त अवघड, जास्त व्यापक आणि मूलगामी होता असं नक्की म्हणता येतं. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य जाती, धर्म, देश, प्रदेश, भाषा यापलीकडचे होतं. बाबासाहेबांचा मानवमुक्तीचा संग्राम एक वैश्विहक मानवी लढा होता. त्यांना अपेक्षित असलेली क्रांती म्हणजे एका राजाचं राज्य जाऊन दुसर्यासचं येणं किंवा एका जातीचे वर्चस्व संपून दुसरीचं निर्माण होणं इतकं नव्हतं. हा विचार भारतीय स्वातंत्र्यलढयापेक्षा मोठा होता तो या कारणांमुळं.
बाबासाहेबांना एकाच वेळी सवर्णांच्या अत्याचाराविरुद्ध, तत्कालीन वंचित समाजातील हीनगंडांविरूढ, ब्रिटिश साम्राज्याच्या कुटील कारस्थानांविरुद्ध, ब्रिटिशांच्या जवळ जाऊन येथील विषमता तशीच ठेवू इच्छिणार्या् सवर्ण नेत्याच्या विखारी प्रचाराविरुद्ध लढा द्यायचा होता. खरं तर त्यांच्या लढयाचं वर्णन एका जुन्या हिंदी गाण्याच्या ओळीतच होऊ शकते.

'निर्बलसे लडाई बलवान की,
ये कहानी हैं दीये की और तुफानकी?'
या लढाईतला दिवा बाबासाहेब होते आणि तुफान होतं अवतीभवतीचं विदारक वास्तव! बाबासाहेब रुपी ज्योतीची लढाई होती, ती प्रचंड मोठया तुफानाशी. आर्थिक पाठबळ नाही, अनुभव नाही, कुणाचा पाठिंबा नाही, उलट सर्व बाजूंनी होत असलेला विरोध आणि चिरडून टाकण्याचा प्रय▪अशी स्थिती. तरीही हा एकटा समतेचा योद्धा सर्वांना पुरून उरला हाच इतिहास आहे. स्वातंत्र्य मिळालं. समानतेची संकल्पना घटनेत आली; पण म्हणून त्यांनी सुरू केलेला संग्राम संपला असं मुळीच नाही. तो पुन्हापुन्हा उफाळत राहतो. दुर्बलांचं दमन करून त्यांच्यावर हुकूमत गाजवण्याची, दुसर्यांचा अधिकार अनीतीनं लुबाडण्याची पाशवी प्रेरणा अनेकदा माणसाला घेरून टाकतेच. त्या प्रत्येक वेळी न्यायाकरता उठलेल्या आवाजात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या शब्दांचा ध्वनी घुमत राहणारच आहे.

विषमतेचे, सामाजिक बहिष्काराचे, हिंदू धमार्तील अत्यंत
क्रूर अशा अस्पृश्यतेचे दाहक अनुभव स्वत: घेतले असूनही बाबासाहेबांनी कोणताही
आक्रस्ताळेपणा केला नाही. त्यांनी एखाद्या संशोधकाप्रमाणं या भयानक रूढीकडंही
अभ्यासविषय म्हणून पाहिलं. कुणाही हिंदू धर्मगुरूनं केला नसेल, इतका हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करून या सामाजिक विकृतीची कारणमीमांसा,
निर्मितीप्रक्रिया, इतिहास त्यांनी
शोधून काढला. त्यातील अन्यायाची बिनतोड कारणमीमांसा केली आणि मग एखाद्या वकिलाप्रमाणं
त्याचा शास्त्रशुद्ध बिनतोड प्रतिवादही केला. 'हिंदू कोड
बील' तयार करताना तर रात्रंदिवस अभ्यास करून करून
बाबासाहेब आजारी पडले होते. तरीही या महात्म्याचा एवढा मोठा प्रयोग अयशस्वी करायचा
प्रय▪मोठमोठया नेत्यांनी केल्याची नोंद इतिहासात आहे. त्यांनी जर हे बील
तयार केलं नसतं, तर सवर्ण हिंदू
स्त्रियांची आज झाली, तेवढी प्रगती झाली असती का, हा विचार प्रतीगाम्यांनी कधीतरी प्रामाणिकपणे करून पाहिला पाहिजे. आज
आपण अमेरिका हे फार प्रगत राष्ट्र आहे, असं समजून चालतो;
परंतु फार थोडया लोकांना हे माहीत असतं, की तिथे स्त्रियांना साधा मतदानाचा हक्क मिळविण्यासाठीसुद्धा लढा
द्यावा लागला होता. भारतीय स्त्रियांना मात्र बाबासाहेबांच्या कृपेनं हा अधिकार
देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या दिवसापासून विनासायास मिळाला. देशातील
प्रत्येक नागरिकाचे मानवी हक्क सांभाळले जावेत, अशी सुंदर
व्यवस्था बाबासाहेबांनी घटनेतच करून ठेवली आहे.
नाशिकच्या काळाराम मंदिरातील
प्रवेशामागंही बाबासाहेबांचं प्रखर चिंतन होतं. त्यांच्यासाठी ती एखादी भावनिक
चळवळ नव्हती. या चळवळीनं हिंदू धर्मात अस्पश्यनां असलेल्या (किंवा खरं तर
नाकारलेल्या ) त्यांच्या स्थानाचं महत्व कळावं आणि त्यांचं हरविलेलं आत्मभान परत
यावं, असं त्यांचं मत होतं. दर्शन नाकारणार्याा देवाच्या मंदिरात जबरदस्तीनं
प्रवेश मिळविणं हा बाबासाहेबांचा उद्देशच नव्हता. भाऊसाहेब गायकवाडांना ३ मार्च
१९३४ रोजी लिहिलेल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात, ''ज्या
देवांची पूजा करण्याचा अधिकार अस्पश्य समाजाला नाकारला गेला आहे, त्यांचीच पूजा करणारे अस्पश्यनी व्हावं, म्हणून
मी हे मंदिरप्रवेशाचं आंदोलन सुरू केलेलं नाही. चातुर्वण्याची उतरंड संपवायला आणि
विषमता समूळ नष्ट करायला आवश्यक असलेले सर्व बदल हिंदू धर्म स्वत:त करणार असेल,
तरच याला काही अर्थ आहे. माझा या आंदोलनामागचा मूळ उद्देश अस्पश्य अस्मिता जागृत व्हावी, एवढाच आहे. या आंदोलनानंतर वंचित
घटकांनी सगळं लक्ष राजकारण आणि शिक्षणावर केंद्रित करावं असं माझं मत आहे.''
बाबासाहेबांनी सर्व महत्वाच्या विषयांचा अभ्यास केला. त्यांचं शैक्षणिक संशोधन जरी अर्थशास्त्रात होतं, तरी त्यांनी 'हु वेअर द शुद्राज' च्या निमित्तानं इतिहासाचा, हिंदू कोड बिलाच्या निमितानं जगातल्या प्रमुख धर्मांचा, मनुस्मृतीच्या निमित्तानं जगातील प्राचीन कायद्यांचा, घटनालेखनासाठी महत्वाच्या देशांच्या घटनांचा, समानतेच्या लढयासाठी समाजशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता; मात्र तत्कालीन सवर्ण समाजानं त्यांचं मोठेपण मान्य केलं नाही. त्यांना श्रेय देताना मनाची कोती वृत्ती अनेकदा दाखविली. महाडच्या चवदार तळ्याचं आंदोलन हे जगाच्या इतिहासात महत्वाचं होतं. माणसाला माणसानं साधं पिण्याचं पाणी जातीच्या आधारावर नाकारणं ही केवढी क्रूरता होती, तीही विषमतेला धार्मिक रूढीचा आधार देवून! कोत्या मनाच्या लोकांनी त्यांचं प्रत्येक क्रांतिकारक पाऊल एका समाजापुरतं, जातीपुरतं र्मयादित करून टाकलं. बाबासाहेब भारतीय समाजाला पचवताच आले नाहीत, समजले नाहीत, पेलले नाहीत असं अगदी खेदानं म्हणावं लागतं.
बाबासाहेब १९५0 साली श्रीलंकेत झालेल्या बुद्ध धर्म परिषदेला गेले होते. तेथून आल्यावर त्यांचा धर्मांतराचा निर्णय जवळजवळ झालाच होता. त्यांनी अनुभवलेला कोणत्याही सुधारणेला असलेला हिंदूधर्ममार्तंडांचा विरोध, सवर्ण नेत्यांची टोकाची अन्याय्य विषमतावादी भूमिका यामुळं बाबासाहेबांनी अखेर हिंदू धर्म सोडला. त्यांनी पाच लाखांहून अधिक निष्ठावान अनुयायांसह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी समानता हे जीवनमूल्य मानणार्याव बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आपल्या जीवनभरच्या स्वप्नाला दिशा दिली. त्यानंतर दोनच महिन्यांनी बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं. नीट लक्षात घेतलं, तर धर्मांतर करतानाही बाबासाहेब भारतीयांवर फार मोठे उपकार केले आहेत. त्यांना आपल्या धर्मात ओढण्यासाठी मध्यपूर्वेतील सर्व धर्मांचे नेते उत्सुक होते. कारण बाबासाहेबांचा केवढया मोठया मानवी समुदायावर विलक्षण प्रभाव आहे, हे त्यांना कळालं होतं. ते ज्या धर्माचा स्वीकार करतील, त्याची लोकसंख्या एका रात्रीत लाखोंनी वाढणार होती; परंतु बाबासाहेबांनी सर्व प्रलोभनं नाकारून शेवटी धर्मही निवडला तो भारतीय मुळाचा ! त्याचं कारणही तसंच होतं. बाबासाहेबांचा कोणताही निर्णय बुद्धीच्या आधारावर घेतला जाई. त्यांचा सर्वच धर्मांचा गाढा अभ्यास झालेला होता. त्यामुळं पारंपारिक संघटीत धर्मात कुठंतरी विषमता, विस्तारवाद, शोषण, गुलामगिरी, स्त्री-पुरुष विषमता कशी हळूच चोरपावलांनी शिरते हे त्यांनी पाहिलं होतं. त्यांना माणसामाणसात कोणताही भेद न करणारा, माणसातील जन्मजात समानता गृहीत धरणारा, सर्वांना सन्मानानं वागविणारा, बुद्धी आणि विज्ञाननिष्ठेला महत्व देणारा, विवेकानं जीवन जगायला शिकविणारा धर्म हवा होता.

Comments
Social Counter