All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    शिक्षण आणि बाबासाहेब


    पुणे जिल्हा लोकल बोर्डातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १८ जानेवारी १९४३ रोजी 
    आर. जी. खंडाळे यांच्या पुढाकाराने सत्कार झाला. त्या प्रसंगीचे छायाचित्र.आपण १९ व्या शतकातील ज्ञानपरंपरेचा आढावा घेतल्यास असं दिसतं, की शिक्षण घेतलेल्या तत्त्कालीन ज्ञानोपासकांनी सुधारणावादी ाळवळीला सर्वोच्च प्राधान्य दिलं होतं. या संदर्भात सुधारकांचे अग्रणी न्या. गोविंद महादेव रानडे यांनी आपल्या ' द राईस ऑफ मराठा पॉवर' या ग्रंथात म्हटलं आहे, की इंग्रज येण्यापूर्वी महाराष्ट्र हा एखाद्या थंड गोळ्यासारखा गोठला गेलेला होता. राजाराम मोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, दादाभाई नौरोजी, महात्मा फुले यांच्यापासून अगदी रार्जषि शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, कृष्णराव भालेकर आदींनी सामाजिक सुधारणा आणि शैक्षणिक क्रांतीचा पाया घातला. बाबासाहेबांनी वस्तुनिष्ठ परिवर्तनासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं होतं. या संदर्भात त्यांनी सायमन कमिशनला जी साक्ष दिली, त्यात ते म्हणतात, की ब्रिटिश भारतातील इतर कोणत्याही समूहापेक्षा अस्पृश्यवर्गीय अल्पसंख्याकांना राजकीय संरक्षणाची गरज आहे. याचं साधं कारण म्हणजे ते शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत. आर्थिकदृष्टया अत्यंत गरीब आहेत. सामाजिकदृष्टया गुलाम केले गेलेले आहेत आणि इतर वर्गांनी सहन केली नाही, अशी निश्चिेतच गंभीर स्वरुपाची राजकीय विकलांगता सहन करीत आहेत. बाबासाहेबांची ही साक्ष पाहिली, तर तत्कालीन समाजाची शिक्षणाची स्थिती स्पष्ट करणारी आहे. गुलामाप्रमाणं वागणूक मिळत असेल, तर शिक्षणाची दारं कशी खुली होणार, हा प्रश्न होताच. शिक्षण आवश्यक असलं, तरी त्यासाठी राजकीय आरक्षण कसं आवश्यक आहे, हे त्यांनी सायमन कमिशनपुढं मांडलं होतं. राजकीय आरक्षणाबाबत आता मत-मतांतर व्यक्त होत असली, तरी बाबासाहेबांनी राजकीय तसंच शिक्षणातही आरक्षण असेल, तरच गरिबांना, दलितांना शिक्षण मिळू शकतं, यावर भर दिला होता. 

    भारतातील सामाजिक आणि धार्मिक विषमता ही जगातील कोणत्याही गुलामगिरीपेक्षा भयंकर होती. वंश आणि वर्णभेद जागतिक मानवतेला विद्रुप करणारी घृणास्पद विकृती म्हणावी लागेल. बाबासाहेब ज्या वेळी विद्यार्थी होते, त्या काळातील त्यांचं शिक्षण म्हणजे एक प्रकारचा सामाजिक चमत्कारच होता. त्यांचे वडील सुभेदार रामजी मालुजी यांना पैशापेक्षा शिक्षण, ज्ञानाची आस लागलेली होती. अगदी ज्ञानेश्वतरीपासून तुकोबांच्या गाथेपयर्ंतच्या ओव्या त्यांना तोंडपाठ होत्या. आपल्या वडिलांच्या अभ्यासाबद्दल व विद्याभिरूचीबद्दल बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं, ते अतिशय महत्त्वाचं आहे. '' आमचे वडील मास्तर होते. ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा एक फार चांगला नियम होता. तो पुढे पाळला गेला नाही, हे आमचे दुर्दैव होय. तो नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातील दरोबस्त सैनिकास सक्तीचं शिक्षण दिलं जात असे. सैनिकांच्या मुला-मुलींसाठी दिवसाच्या शाळा असून प्रौढ लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत. अशा शाळेत माझे वडील १४ वर्षे हेडमास्तर होते. सैनिकांसाठी चांगले शिक्षक तयार करण्यासाठी पुण्यात एक 'नॉर्मल' शाळा होती. त्या शाळेत शिकून वडीलांनी मास्तरचा डिप्लोमा मिळविला होता. त्यांची शिकविण्याची पद्धत फार वाखाण्यासारखी होती. त्यामुळं आमच्या वडिलांमध्ये शिक्षणाविषयी आस्था व आवड निर्माण झाली होती. आमच्या घरांतील बायका-मुलांनासुद्धा उत्तम लिहिता-वाचता येत होतं. इतकंच नव्हे, तर पांडव प्रताप, रामायणासारखे ग्रंथ वाचून त्यावर निरुपण करण्याची शक्तीही वडिलांच्या प्रोत्साहनानं माझ्या थोरल्या बहिणीत आली होती.'' बाबासाहेबांची वैचारिक जडणघडण होण्यात त्यांच्या वडिलांचा किती मोठा वाटा आहे आणि त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांना एक एक ध्येय गाठण्यात त्यांना घरातून मिळालेले हेडमास्तरी धडेच कसे उपयुक्त आहेत, हे समजण्यासाठी बाबासाहेबांनी उद् धृत केलेला उतारा किती महत्त्वाचा आहे, हे यावरून लक्षात यावं.

    बाबासाहेब हे खालच्या स्तरातील मानवी समूहाला शिक्षण देण्याबाबत किती आग्रही होते, त्यांची शिक्षणाबाबतची सामाजिक तळमळ किती मूलगामी होती, याचा प्रत्यय त्यांच्या जीवनातून तर येतोच; परंतु अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीतून त्यांच्या शिक्षणाचा पाया घातल्याचं दिसतं. त्यांच्या विलायतेतील विद्यार्थी दशेतील काळ हा क्रांतिकारक होता. एम. एस्सी, डी. एस्सी व 'बार अँट लॉ' या उच्च पदव्या अमेरिका व इंग्लंडमधून मिळविल्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. विद्यार्थी आंबेडकर व संशोधक आंबेडकर हा कालखंड जगाच्या सांस्कृतिक व शैक्षणिक इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. त्यांची विद्यार्थिदशा आणि त्यासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता याचा प्रभाव त्यांच्या पुढील आयुष्यात अत्यंत खोलवर पडलेला दिसतो. त्यांनी १९२७ साली तत्कालीन विद्यामंत्र्यांना पटवून देताना जे म्हटलं आहे, ते आजही विचार करण्यासारखं आहे. ''प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असं असलं पाहिजे, की मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत घातली, तर त्याचं किंवा तिचं शिक्षण लिहिता-वाचण्याच्या अवस्थेपयर्ंत राहू नये, तर तो संपूर्णपणे सुशिक्षित होऊनच बाहेर पडावा व पुढील आयुष्यातसुद्धा ज्ञान घेतच असावा.'' बाबासाहेबांनी इतक्या छोट्या वाक्यातूनही प्राथमिक शिक्षणाचं ध्येय काय असावं, त्याचं संपूर्ण शिक्षण म्हणजे काय, ते कसं थांबू नये, लिहिता-वाचता आलं म्हणजे शिक्षण नव्हे, तर संपूर्ण सुशिक्षित याचा व्यापक अर्थ म्हणजे शिक्षण हा अर्थ त्यांनी घेतला होता. प्राथमिक शिक्षणाचा इतक्या गंभीरपणे खचितच कोणी विचार केला असेल. शिक्षण मध्येच थांबू नये, असं त्यांचं मत होतं. त्याबाबतही त्यांनी इंग्रज सरकारला पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, की पहिल्या वर्गात जर शंभर मुलं घातली, तर त्यापैकी कुणीही मध्येच शिक्षण थांबवू नये. ती सर्व मुलं शिक्षण संपेपयर्ंत टिकली पाहिजेत. त्यासाठी शासनानं

    जास्तीत जास्त अनुदान मंजूर करून विद्यार्थ्यांवर जास्त फी आकारली जाऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. जास्त फी आकारली, तर शिक्षणाचं व्यापारीकरण होते आणि मग शिक्षणाचा स्तर खालावतो. तसंच श्रीमंताची मक्तेदारी होते. बाबासाहेबांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी मांडलेले विचार सध्याच्या शैक्षणिक जगताशी किती चपखल बसतात, हे लक्षात येतं. 

    शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची आपण सध्या चर्चा करतो आहोत. बाबासाहेबांनी त्याचवेळी ब्रिटिश सरकार, नगरपालिका तसंच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडं शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा आग्रह धरला होता. यावरून ते किती दूरदृष्टीचं होतं, हे लक्षात यावं. शिक्षणाचं महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणतात, ''उपासमारीनं शरीराचं पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसंच शिक्षणाच्या अभावी तो निबरुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुस-याचा गुलाम होतो.'' बाबासाहेब उपासमारीरपेक्षाही शिक्षणाला किती महत्त्व देत होते, हे समजण्यास त्यांचे हे उद्गार उपयुक्त ठरतात. वंचित आणि शोषितांसाठी त्यांच्या लेखी शिक्षणाचं महत्त्व आगळं वेगळं होतं. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात त्यांनी शिक्षणसंस्था काढायला दिलेलं प्राधान्य आणि दलितांच्या उच्च शिक्षणाची त्यांची तळमळ विविध उदाहरणांवरून दिसते. राष्ट्राच्या उभारणीत उच्च शिक्षणाचं महत्त्व ते अधोरेखित करतात. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशीला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते झाली. त्यावेळी त्यांनी केलेलं भाषण खालच्या स्तरातील लोकांमधील न्यूनगंड काढून टाकण्यावर भर देणारं होतं. ''ज्या न्यूनगंडानं खालच्या स्तरातील लोकांची वाढ खुंटविली आणि त्यांना दुसर्या चं गुलाम बनविलं, तो न्यूनगंड त्या लोकांमधून काढून टाकणं आणि अस्तित्त्वात असणार्या  सामाजिक दर्जानं क्रूरपणे लुबाडलेली त्यांच्या स्वत: च्या आयुष्याच्या महत्त्वपूर्णतेची जाणीव त्यांच्या स्वत: साठी आणि देशासाठी त्यांच्यात निर्माण करणं ही खालच्या स्तराची समस्या आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसारावाचून अन्य कशानंही हा हेतू सिद्धीस जाणार नाही. माझ्या मते आपल्या सर्व सामाजिक जाचांवर हा सर्वपरिहारक उपाय आहे,'' हे त्यांच्या भाषणातील दोन मुद्दे पाहिले, तर उच्च शिक्षण हेच गुलामगिरी, न्यूनगंड आणि जाणीव जागृतीसाठी कसं उपयुक्त आहे, यावर त्यांनी भर दिलेला दिसतो.

    या ग्रंथात विद्यार्थी आंबेडकरांच्या वैचारिक परिवर्तनाच्या उत्क्रांतीचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून वेध घेण्याचा प्रयकेला आहे. 


    बाबासाहेब यांची जगाला ओळख विद्वतजन अशी असली, तरी सुरवातीच्या काळात मात्र त्यांची अवस्था इतर सर्वसामान्य मुलांसारखीच होती. साता-याच्या शाळेत असताना वर्गात जेवढं आणि जसं शिकविलं जाई, तेवढाच त्यांचा अभ्यास होता. शाळेतून आल्यानंतर ते दप्तर भिरकावून देत. थेट दुस-या दिवशी ते दप्तराला हात लावीत. अभ्यासाचा आणि त्यांचा काहीच संबंध नसायचा. उलट कोणी दप्तर नीट ठेवलं, तर त्याबाबत ते आकांडतांडव करीत. 

    बाबासाहेबांचं जीवन हे पराकोटीची तत्त्वनिष्ठा जपलेला एका महान संघर्ष होता. ज्ञानसाधनेच्या अथांग परिश्रमामुळं त्यांच्या स्वभावात एकप्रकारचा असाधारण चिवटपणा आला होता. जीवनातील संकटं व मोह यांना तोंड देण्यास लागणारा कणखरपणा, मनोनिग्रह त्यांच्या अंगी संस्कारातून आला. संत कबीर, महात्मा फुले यांना बाबासाहेब ज्ञान आणि सत्याचे उपासक गुरू मानत. आपल्या सामाजिक जडणघडणीत ज्यांचा मोठा प्रभाव पडला, त्याविषयी बाबासाहेबांनी २८ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबईत केलेल्या भाषणात म्हटलं होतं, की माझ्यामध्ये काही उपजत गुण होते, म्हणून मी या पदाला पोचलो, असं काही नाही. माझं आयुष्य जसं चाललं होतं, तसं चालू दिलं असतं, तर मी एक नीतीपर माणूस झालो असतो; परंतु मला एक पूर्ण आठवण होती. 

    माझ्या आयुष्याला जे काही वळण मिळालं, ते का मिळालं, कसं मिळालं, याचं उत्तर माझ्यावर या तीन गुरुंच्या पडलेल्या प्रभावात आहे. माझे तीन गुरू आहेत. प्रत्येकाला जसे गुरू असतात, तसेच मलाही होते. भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले या तिघांना बाबासाहेबांनी गुरुस्थानी मानलं. ती त्यांची दैवतं होती. 
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES