डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धम्मदीक्षा देताना भंते चंद्रमणी.''मी हिंदूं म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,''अशी घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ मध्ये येवला येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेत केली. बाबासाहेबांनी घोषणा का केली, याचं गूढ आंबेडकरांच्या अनुयायांनी उकलणं आवश्यक आहे. या घोषणेचं मूळ कारण म्हणजे इथली चातुर्वण्यव्यवस्था होय. या व्यवस्थेनं समाजात धर्मांधता, जातीयता, विषमता, अन्याय, दैववाद, रुढी व परंपरा निर्माण करुन सामान्य माणसांचं शोषण केलं जायचं. त्यांच्या जगण्याचे हक्क नाकारले होते. त्यांचं मानवी जीवनच हिरावून घेतलं होतं. त्यांना या व्यवस्थारुपी मगरमिठीत चांगलंच अडकून टाकलंहोतं. या व्यवस्थेची झळ बाबासाहेबांना लहानपणापासूनच बसली होती. त्यांना याच व्यवस्थेनं छळलं होतं. त्यांची अस्पृश्य म्हणून अवहेलना केली होती. ते ज्ञानवंत, प्रज्ञावंत असतानाही त्यांचा तिरस्कार केला जायचा. स्वांतत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्य या व्यवस्थेनं नाकारली होती. त्यामुळं बाबासाहेब अस्वस्थ होतं. त्यांना चीड येत होती. अशा जीवघेण्या प्रश्नापासून समाजाला मुक्ती मिळावी, यासाठी ते अहोरात्र धडपडत होते, म्हणून त्यांना धर्मांतराची घोषणा करावी लागली. बाबासाहेबांनी नागपूर येथे अशोका-विजयादशमीच्या दिवशी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
बाबासाहेब ज्या हिंदू धर्मात राहत होते, त्या धर्मात मात्र व्यक्तिला स्थान नव्हतं. त्या धर्मात विषमता मात्र खचाखचा भरलेली होती. एकानं विद्या शिकावी, दुसर्यातनं हातात शस्त्र धरावं, तिसर्याानं व्यापार करावा व चौथ्यानं मात्र सेवा करावी, अशी अन्यायकारक विभागणी हिंदू धर्मानं केली होती, ती त्यांना मान्य नव्हती. मानवाचा विकास करावयाचा असेल, मानवी जीवन व मानवी व्यक्तिमत्व फुलवायचं असेल, त्याला मान, सन्मान व प्रतिष्ठा मिळवायची असेल, तर विद्या, शस्त्र आणि पैशाची गरज असते. नेमकं तेच अस्पृश्याकडून हिरावून घेतलं होतं. अस्पृश्यांनी कायम गुलामीत राहावं असं एक षडयंत्र रचलेलं होतं. बाबासाहेबांना ते पटलं नाही, म्हणून तो धर्म नाकारण्याचा प्रय▪बाबासाहेबांनी केला आहे. त्याबाबत ते म्हणतात, की आपली ही दुर्बलतेची आणि अवनतीची स्थिती आपण हिंदू समाजाचे घटक आहोत, म्हणून आपल्यावर ओढवली आहे. जो धर्म आपल्याला समान दर्जा देईल, समान हक्क देईल आणि योग्य तर्हेसनं वागवील, अशा एखाद-दुसर्याण धर्मात जावं असं तुम्हाला वाटत नाही का?, असं त्यांना विचारण्यात आलं, तेव्हा आवाज चढवून ते म्हणाले, ''हिंदू धर्माशी असणारा संबंध तोडा. स्वाभिमान आणि शांतता मिळेल अशा दुसर्याल धर्मात जा; परंतु लक्षात ठेवा. जो धर्म तुम्ही निवडाल. त्यात समान दर्जा, समान संधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे.''
जो धर्म माणसाचं शोषण करतो. समानता निर्माण करीत नाही किंवा चांगलं वागवीत नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्य समाजाची कधीच उन्नती आणि प्रगती होणार नाही, त्यांनी ओळखलं, म्हणूनच त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना धर्मांतराबाबत ठणकावून सांगितलं.
बाबासाहेबांनी येवला येथे धर्मातरांची घोषणा केल्यानंतर विविध धर्मांतील धर्मप्रचारक येऊन त्यांना भेटले. आमचा धर्म स्वीकारा अशी गळ घातली. वेगवेगळया परिषदेची निमंत्रणं आली. आमिष यायला लागली; परंतु बाबासाहेब कुठल्याच आमिषाला, प्रलोभनाला बळी न पडता विविध धर्मांचा चिकित्सक अभ्यास केला. हा अभ्यास करताना त्यांना वाटत होतं, की हिंदू धर्म व त्यातील क्लिष्ट अशा गोष्टीत सुधारणा झाली, तर बरं होईल; परंतु हिंदू धर्मात काहीच बदल झालेला दिसत नव्हता. पुढं होईल असंही वाटत नव्हतं, म्हणून त्यांनी शेवटी अभ्यासांती धर्म बदलण्याचा विचार केला आहे. तो विचारही त्यांच्या मनावर लहानपणीच कोरला गेला होता. मानवी कल्याणाचा विचार करणारा धर्म म्हणजे बौद्ध धम्म आहे, असं त्यांना वाटलं. त्यांनी त्या दिशेनं पाऊल उचलण्यास सुरवात केली व बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. दीक्षाभूमी येथे 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, की बौद्ध संघ हा सागराप्रमाणं आहे. या संघात सर्व समान व सारखे असतात. सागरात मिळाल्यावर हे गंगेचं किंवा हे नदीचं पाणी असं ओळखणं अशक्य असतं. त्याचप्रमाणे बौद्ध संघात आलं म्हणजे आपली जात व सर्वजण समान असतात असं समतेनं सांगणारा एकच महापुरुष आहे आणि तो महापुरुष म्हणजे तथागत बुद्ध.
स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारलेल्या, मानवी कल्याणाचा मार्ग दाखविणार्याा, विषमतेला थारा न देणार्याय, समतेच्या पायावर उभ्या असणार्या , दैववादाला व कर्मकांडाला नाकारणार्याि, रुढी-परंपरांना आणि अंधश्रद्धांना मूठमाती देऊन विज्ञानवादी दृष्टिकोनाकडं घेऊन जाणार्याअ बौद्ध धम्माचा स्वीकार बाबासाहेबांनी केला. लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. अस्पृश्य समाजबांधवाना गुलामगिरीच्या जोखाडातून बाहेर काढलं. धर्म आणि धम्म यात फार मोठा फरक आहे. धर्म हा रुढी, परंपरा, विशषता, कर्मकांड, पाप-पुण्य, अंधश्रद्धा, दैववाद, जातीयता या सर्वाना झुगारुन देणारा आहे. धर्म मानवाला अधोगतीकडं घेऊन जातो. धम्म मानवाला प्रगतीकडं नेतो. धर्म जीवनात अंधार निर्माण करतो, तर धम्म विज्ञानाकडं घेऊन जातो. धर्म अंधश्रद्धेकडं घेऊन जातो. धर्म अपरिवर्तनशील आहे, तर धम्म परिवर्तनशील आहे, म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वक बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे.
बाबासाहेबांनी धर्मातंर केलं, ती जादूची कांडी नाही किंवा चमत्कार नाही. तो मानवी कल्याणाचा मार्ग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धम्म म्हणजे परिवर्तनशील विचारांची दिशा आहे. स्वाभिमानी बनविणारं ते एक रसायन आहे. अत्यंत विचारशीलतेनं घेतलेला तो एक अनमोल निर्णय आहे. ती एक सामाजिक क्रांती आहे. ती जीवनपद्धती आहे. धम्म म्हणजे माणूस निर्माण करणारं एक केंद्र आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय निर्माण करणारं एक संस्कारकेंद्र आहे. धम्माप्रमाणं वागणं, विचार करणं व आचरणात आणणं व धम्माविशषी इतरांना माहिती सांगणं हे आमचे कर्तव्य आहे. 'मी सारा भारत बौद्धमय करीन,' हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रय▪करणं सार्याे आंबेडकर अनुयायाचं काम आहे. कारण जगाचा उद्धार करण्याची क्षमता या धम्मात आहे, असं बाबासाहेब म्हणत असत. ''धम्म म्हणजे गळयात मढं अडकवून घेत आहोत, असं मानू नका. बौद्ध धम्माच्या दृष्टीनं भारताची भूमी सध्या शून्यवत आहे, म्हणून आपण उत्तम रीतीनं धम्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे, नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला, असं जग म्हणेल. असं होऊ नये, म्हणून आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच नव्हे, तर या जगाचाही उद्धार करू. कारण बुद्ध धम्मानंच जगाचा उद्धार होणार आहे,'' असं ते म्हणतात.
आताच्या नवीन पिढीचे विचार मात्र फार वेगळे वाटायला लागतात. बाबासाहेबांच्या विचारात आणि त्यांच्या विचारात प्रचंड तफावत दिसते. बाबासाहेबांना समाजाला जी तळमळ होती, ती आता दिसत नाही. मी आणि माझं कुटुंब हीच भावना रूढ झालेली दिसते. जीवन जगण्यासाठी विचारांची बैठक निर्माण करावी लागते आणि त्याच विचारानं पुढं पुढं मार्गक्रमण करावं लागतं; परंतु तसा विचार आजच्या आंबेडकर अनुयायांकडं दिसत नाही. आजची पिढी या विचारापासून दूर गेल्यामुळं भरकटली आहे, की काय असा प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे. केवळ बाबासाहेब सवलतीपुरते आहेत, की काय अशी शंका यायला लागते. या सर्व गोष्टीचा विचार करून वेळ, काळ व भान याकडं लक्ष ठेवून पावले उचलली पाहिजेत. या देशाला तथागत बुद्धाच्या व बाबासाहेबांच्या विचारांची फार गरज आहे. तोच विचार देशाला तारून नेईल, असा आशावाद आहे. त्यामुळं त्यांच्याच विचारानं पुढे जाण्यात आंबेडकर अनुयायांचं हीत आहे, कल्याण आहे, हे लक्षात ठेवायला हवं. बुद्धाचा व बाबासाहेबांचा विचार म्हणजे केवळ अस्पृश्यासाठीचा विचार आहे असं नव्हे, तर अखंड मानव जातीच्या, सर्व धर्मांच्या लोकांच्या कल्याणाचा विचार आहे, हे त्यांनी तयार केलेल्या संविधानातूनही दिसतं. त्यामुळं याच विचारांच्या वाटेनं सर्वांनी चालायला काहीच हरकत नाही.
बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला, या सर्व गोष्टींचा सर्व अंगानं विचार करूनच आंबेडकर चळवळीतील अनुयायांनी वागलं पाहिजे. धम्माची चळवळ पुढं घेऊन जाण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असायला हवं. बौद्ध धम्माबददल बाबासाहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे, त्या अपेक्षांना आपण पात्र ठरतो आहोत का? धम्माचं तंतोतंत नाही; पण काही अंशानं का होईना; पण पालन करतो का, याचाही विचार करणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी फार मोठया गांभीर्यानं विचार करून या धम्माचा स्वीकार केला आहे, तेवढयाच गांभीर्यानं आम्ही त्याकडं पाहिले पाहिजे. आंबेडकर अनुयायी डॉ. आंबेडकरांच्या विचारांना आणि बौद्ध धम्माच्या विचारांना म्हणजेच तथागत बुद्धाच्या विचारांना बगल देऊन समाजात वावरताना दिसतो आहे. कारण आजही समाज दैववाद, कर्मकांड, अंधश्रद्धांच्या नादी लागलेला दिसतो आहे. शिकलेल्या माणसांच्या घरातही मोठमोठे देवाचे देव्हारे किंवा घर बांधताना देवघर तयार करताना दिसतात. स्वाभिमानी जीवन जगायचं सोडून लाचारी जीवन जगतात.अशांनी बुद्घाच्या व बाबासाहेबांच्या गौरवशाली इतिहासाची, संस्कृतीची आठवण ठेवणं गरजेचं आहे.
Comments
Social Counter