All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    7. डेबूजीचे गोधनावरचे प्रेमअध्याय

    अध्याय 7 - डेबूजीचे गोधनावरचे प्रेमअध्याय

    डेबुजीडीच्या चरित्राचा श्रीगणेशाच गोधनाच्या संगतीत नि गोसेवेच्या संगीतात झाल्यामुळे, ज्याचे बैल उत्तम त्याची शेती उत्तम हे तत्त्व त्याच्या मनावर खोल कोरले गेलेले होते. गोरक्षणाचे मूळ बीजच त्याने हेरले होते. औताच्या बैलांची तर तो स्वतःच्या प्राणापलीकडे निगा ठेवीत असे. गायीला गो-हा झाला का डेबुजी त्या गाईची धार काढायचा नाही. सारे दूध गो-ह्याला पिवू द्यायचा. कोणाला काढूही द्यायचा नाही. लहानपणी गो-ह्यांना भरपूर दूध मिळाले म्हणजे ते पुढे हाडापेराने बळकट ताकदवान बनतात. अशा २-३ खोंडांना भरपूर दूध पाजून त्याने नमुनेदार बैल बनवले होते.


    सावकारशाहीच्या पोखरणीचे गिरमिट लागलेल्या चंद्रभानजीने गो-हे विकण्याचा प्रश्न काढताच डेबुजीने जीव देईन पण माझे खोंड विकू देणार नाही, असा खडखडीत प्रतिकार केला. खोंड नाही तर म्हातारा बैल तरी विकला पाहिजे, असा आग्हर पडताच, डेबुजीने करड्या आवाजात आजोबाला नि मामाला बजावले - ``दोनच काय तीनही गो-हे टाका विकून. पण त्या म्हाता-या बैलाला मी विकू देणार नाही. जन्मभर त्याने तुमचे काबाडकष्ट केले. हजारो रुपयांचे धान्य पिकवले. तुमच्या श्रीमंतीचा बडेजाव सांभाळला. पोटच्या पोरासारखा आजवर त्याला पाळला, पोसला नि राखला. आज तो म्हातारा झाला म्हणून काय त्याला कसायाला विकणार तुम्ही? ही काय माणुसकी झाली? म्हाता-या बैलाप्रमाणे उद्य म्हाता-या माणसांचीही अडगळ घरातलं काढायला लोक सवकतील, तर त्यांचे हात कोण धरणार? तो बैल विकाल तर उद्यापासून मी औताला जाणार नाही, मला घरात ठेवा नाहीतर हुसकून द्या. कुठेही चरा घरं भीग मागून पोट भरीन, पण असा कसायीखाना मला परवडणार नाही.’’

    मामा, घाबरता कशाला?  
    डेबुजीचे म्हणणे कितीही खरे असले तरी त्याने कर्जाचा बिनबुडाचा खळगा थोडाच भरणार होता? चंद्रभानजी तर अगदी टेकीला आला. डेबुजीने त्याला धीर देण्याचा खूप यत्न केला. तो म्हणाला, - ``मामा, आपण उपाशी राहू. अंगावर कपडा घालणार नाही. सणवार करणार नाही. मुलाबाळांसह खूप कष्ट करू आणि आपल्या मायपोट शेतीच्या पिकांवर या सावकारी पाशातून मोकळे होऊ. पण यापुढे त्या सावकार यमाची पायरी चढणार नाही अशी शपथ घ्या. खोटेनाटे हिशोब ठेवून त्यानं तुम्हाला सपशेल फसवलंय. चांगल्या हिशेबी माणसाकडून त्याचे हिशेब तपासून घ्या नि खोट्यानाट्याची सरकारात फिर्याद लावा. बाकीचे मी पाहून घेतो.’’

    झालंय कधी अं?
    फिर्याद? कुळाने सवाकरावर लावायची? खोट्या हिशेबाबद्दल? झालंय कधी असं? शेतक-याचे म्हणणे कितीही खरे असले, तरी न्यायमंदिरात कागदाची जबानी खरी ठरत असते. आणि कागदांवरच्या आकड्यातच सावकारी कोलदांड्याची सारी शहामत सामावलेली असते. सावकारी आकडेमोडीमुळे चांगले शिकले सवरलेले शहाणे कोर्टात गाढव ठरतात. तिथे जन्माचे अडाणी नि नाक्षर अशा नांगरड्यांचा काय पाड?
    कर्जफेडीसाठी शेती उमाप पिकवण्याचा डेबुजीचा अट्टहास चालू असतानाच, चंद्रभानजी ताप घेऊन झुरणीला लागला आणि थोड्याच दिवसांत मरण पावला. हंबीररावचे घरच बसले. घरात विधवा सून नि एक लहान नातू बळिराम. सगळा भार डेबुजीवर पडला.

    THOUGHTS ON LINGUISTIC STATES